Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

मित्राच्या वाढदिवसात तलवार घेवुन नाचने पडले महागात

mh20live Network

औरंगाबाद: दिनांक 12/12/2020 रोजी 21.30 वाजेच्या सुमारास जिन्सी पोलीसांना गोपणीय माहीती
मिळाली की, किराडपुरा पाण्याचे टाकीजवळ मोकळे मैदाणात रियाज नावाच्या मुलाचा
वाढदिवस आहे व त्याचे वाढदिवासामध्ये इसम नामे 1) शेख मुद्दसीर पिता अब्दुल खादीक
वय 19 वर्ष रा रहेमानीया कॉलनी ग नं 8 औरंगाबाद 2) इलीयास ऊर्फ इल्लु पिता अझहर
मौलवी पटेल वय 20 वर्ष रा रहेमानीया कॉलनी ग नं 9 औरंगाबाद हे दोघे तलवाल घेवुन
नाचनार आहे त्यावरुन पोलीस निरीक्षक केंद्रे यांनी एक टिम तयार करुन खात्री
करण्यासाठी किराडपुरापाण्याचे टाकीजवळील मोकळयामैदाणात पाठविली असता इसम
नामे 1) शेख मुद्दसीर पिता अब्दुल खादीक वय 19 वर्ष रा रहेमानीया कॉलनी ग नं 8
औरंगाबाद 2) इलीयास ऊर्फ इल्लु पिता अझहर मौलवी पटेल वय 20 वर्ष रा रहेमानीया
कॉलनी ग नं 9 औरंगाबाद हे रियाज याचे वाढदिवसामध्ये तलवार फिरवताना मिळुन
आले आहे जिन्सी पोलीसांनी 1) शेख मुद्दसीर पिता अब्दुल खादीर वय 19 वर्ष रा.
रहेमानीया कॉलनी ग नं 8 औरंगाबाद यास तलावरीसह ताब्यात घेतले आहे तसेच इसम
इलीयास ऊर्फ इल्लु हा घटनास्थळावरुन पळुन गेला आहे नमुद इसमास तलवारीसह
पोस्टेला आणुन शस्त्र अधिनियम प्रमाणे दोन्ही इसमाविरुध्द गुन्हा दाखल केला असुन
गुन्हयाचा पुढील तपास पोउपिन शेख हे करीत आहेत.सदरची कामगीरी मा.पोलीस आयुक्‍त औरंगाबाद शहर, डॉ. निखील गुप्ता साहेब मा. पोलीस उपआयुक्त दिपक गि-हे साहेब, मा. निशीकांत भुजबळ सहायक पोलीस
आयुक्‍त साहेब सिडको विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक व्ही. एम. केंद्रे,
‘पोलीस उपनिरीक्षक दत्ता शेळके, सहायक फौजदार संपत राठोड, पोलीस हवालदार
हारुण शेख, पोलीस नाईक संजय गावंडे, धंनजय पाडळकर, नंदु चव्हाण, संतोष बमनात
यांनी केली आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close