Subscribe to our Newsletter
Loading
क्राईमलाईफ स्टाईल

चक्क:क्लासरुममध्येच अल्पवयीन जोडप्याने उरकले ‘ शुभमंगल ‘

, व्हिडीओ व्हायरल झाल्यावर चौकशी सुरु

काँलेजचे मध्ये शिकवण्यासाठी ,जातात ,पण त्याच.बरोबर योग्य मार्गदर्शन मिळवून उच्च द्ये.,बघत आसतात मात्र ,चक्क ,शुमगलच उरकले आहे .शाळा कॉलेजमध्ये शिकण्याच्या वयात प्रेमात पडणं हे आता नवं नाही मात्र वर्गामध्येच लग्न उरकून त्याचा व्हिडीओ व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार आंध्रप्रदेशात उघडकीस आला असून व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी सदर प्रकाराची चौकशी सुरु केली आहे . प्रेमानंतरची पुढची पायरी म्हणजे लग्न मात्र ही पायरी गाठण्यासाठी स्त्री आणि पुरुषांना कायद्याचे बंधन आहे. काही वेळी प्रेमात पडलेली मुलं-मुली कायद्याचे हे बंधन पाळत नाहीत. सतरा वर्षांच्या अल्पवयीन मुलाने आणि मुलीने वर्गातच लग्न केल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला असून व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना जाग आली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातल्या राजमहेंद्रमधील एका ज्युनिअर वर्गात हा सर्व प्रकार घडला. या प्रकरणातला मुलगा 17 वर्षाचा असून त्याने त्याच्याच वर्गात शिकणाऱ्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र घातले आणि तिच्याबरोबर लग्न केले. त्या दोघांनी नंतर लग्नाचा एकत्र फोटो देखील काढला. या लग्नाला त्यांच्या वर्गातले मित्र देखील उपस्थित होते. या ‘ समारंभास ‘ विद्यार्थ्यांमधील एकाने या लग्नाचा व्हिडिओ शूट केला आणि मित्रांमध्ये व्हायरल केला.

लग्न करणाऱ्या दोन्ही अल्पवयीन मुलांवर कॉलेज प्रशासनाने कारवाई केली असून त्यांना कॉलेज सोडून जाण्यास सांगितलं आहे. आंध्र प्रदेशच्या महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून दोन्ही अल्पवयीन मुलांना कौन्सलिंगसाठी पाठवण्यात आलं आहे. मुलीच्या घरच्यांनी तिला स्वीकारण्यास देण्यास नकार दिल्याने महिला आयोगाने मुलीला तात्पुरता आश्रय दिला आहे.‘कॉलेजच्या वर्गात लग्न करण्यासाठी मुलांना कुणी संरक्षण दिलं?’ याचा पोलीस सध्या तपास करत आहेत.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close