Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

पैठण येथे युवकाचा तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून खून, पैठण शहरात खळबळ


पैठण/किरण काळे पाटील


पैठण येथील गोदा काठावरील गंगेश्वर महादेवाच्या मंदिराजवळ एका युवकाचा गळा चिरून खून करण्यात आला असून या घटने ची माहिती मिळताच पोलिसानी घटना स्थळी धाव घेऊन जखमी युवकास शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील काहरवाडा वॉर्डातील.युवक नंदू देविदास घुंगासे वय 25 हा गोदाकाठ जवळली गंगेश्वर मंदिरा जवळ जखमी अवस्थेत व रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असल्याची माहिती पोलिसाना मिळाली. पोलिसानी तात्काळ जखमी अवस्थेत शासकीय रुग्णालयात हलविले.या ठिकाणी असलेल्या वैधकीय अधिकारीनी त्यास तपासले असता मयत झाला असल्याचे घोषित केले.दरम्यान घटना स्थळी पोलिसानी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी काहीही शस्त्र आढळून आले नाही. सकाळी सदरील युवकाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.या घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.रात्री उशिरा पर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. काही दिवसांपूर्वीच पैठण शहरा जवळील जुने कावसन येथे तिहेरी हत्याकांड झाले असून त्या आरोपीचा अद्याप शोध लागला नाही हे विशेष.या घटनेमुळे पैठण शहरासह तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close