हृदयविकाराचा तसेच पक्षाघाताचा झटका आलेल्या ५८ वर्षीय व्यक्तीवर नाशिकच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार
स्ट्रोकला वेळीच हस्तक्षेप करण्याचे डॉक्टरांचे आवाहन – वेळीच उपचार न केल्यास कायमचे अपंगत्व
नंदुरबार : नाशिकच्या वोक्हार्ट हॉस्पिटलमधील डॉ. नितीन कोचर (हृदयविकार सर्जन) आणि डॉ. विशाल सावळे ( न्यूरोलॉजिस्ट आणि स्ट्रोक स्पेशलिस्ट) यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोक असलेल्या ५८ वर्षीय व्यक्तीला यशस्वीरित्या जीवनदान दिले. स्ट्रोकमुळे या रुग्णाला संपुर्ण डाव्या बाजूचा पक्षाघात झाला. हा रुग्ण व्हेंटिलेटरवर होता आणि त्याला त्याची दैनंदिन कामं जसे की चालणे, बोलणे किंवा खाणे देखील शक्य नव्हते, त्याने आपला दिनक्रम पुन्हा सुरू केला आहे.

नंदुरबार येथील रहिवासी असलेले ५८ वर्षीय संजय बावसर यांना मार्चमध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटका आला ट्रिपल वेसल ब्लॉकमुळे रुग्णाला बायपास सर्जरीसाठी तात्काळ वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
डॉ. नितीन कोचर, वोक्हार्ट हॉस्पिटल, नाशिकचे सल्लागार हृदय व थोरॅसिक सर्जन सांगतात की, आपत्कालीन स्थितीत दाखल झाल्यावर रुग्णाला श्वासोच्छवासाचा त्रास, छातीत दुखणे आणि जीव घाबरणे यासारखा त्रास होत होता. त्याच्या अँजिओग्राफीमध्ये त्याच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्याचं समोर आलं. त्यानंतर, रुग्णाला कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्ट सर्जरी (सीएबीजी) करण्याचा सल्ला देण्यात आला.
डॉ विशाल सावळे, वोक्हार्ट हॉस्पिटल, नाशिकचे न्यूरोलॉजिस्ट आणि स्ट्रोक स्पेशालिस्ट म्हणाले, सीएबीजीच्या दुसऱ्या दिवसानंतर, त्यांना ब्रेन स्ट्रोक आला ज्यात त्यांची डाव्या बाजूस 100% अर्धांगवायू झाला होता. त्याच्या हृदयाच्या आणि मेंदूच्या रक्तवाहिन्या एकाच वेळी ब्लॉक झाल्या होत्या. स्ट्रोक ब्रेनस्टेममध्ये होता, त्यानंतर रुग्ण व्हेंटिलेटरवर होता, 3 दिवस कोमात असलेल्या या रुग्णाने हळूहळू उपचारांना प्रतिसाद दर्शविला.त्यानंतर ट्रेकिओस्टोमी करण्यात आली आणि त्याला रायल्स ट्यूब फीडिंगवर ठेवण्यात आले. रुग्णाला इमर्जन्सी क्लॉट बस्टिंग औषध देण्यात आले. त्याची प्रकृती हळूहळू सुधारू लागली आणि तो चालू, बोलू लागला. बरे होण्यासाठी त्याने स्पीच आणि फिजिओथेरपी घेतली. त्याला 15 दिवसांनंतर ट्रेकीओस्टोमी ट्यूब घालून घरी सोडण्यात आले. दोन आठवड्यांनंतर ते काढण्यात आले कारण रुग्णास आता गिळता येऊ लागले होते. स्ट्रोक हा विनाशकारी आहे आणि त्याची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. वेळेवर उपचार न केल्यास कायमचे अपंगत्व येऊ शकते. स्ट्रोक कोणालाही, कुठेही आणि कधीही होतो. संतुलन कमी होणे, दृष्टी धूसर होणे किंवा कमी होणे, चेहर्याचा काही भाग किंवा संपुर्ण चेहरा क्षीण होणे, हात कमकुवत होणे, बोलण्यात अडचण येणे अथवा वेळ लागणे ही स्ट्रोकची लक्षणे ओळखणे अत्यावश्यक आहे. वेळेवर उपचार केल्याने रक्ताभिसरण पुनर्संचयित करून मेंदूचे नुकसान टाळता येते.
माझ्या भावाला सुरुवातील हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर पक्षाघाताचा झटका आला हे कळालावर संपुर्ण कुटुंब चिंताग्रस्त झाले होते. स्ट्रोक म्हणजे नेमके काय आणि तो का होतो याबद्दल आम्हाला पूर्ण माहिती नव्हती. नेहमी सक्रीय असलेला माझा भाऊ अंथरुणाला खिळलेला पाहून आम्हाला धक्का बसला. पण, आम्ही त्याला पुन्हा पुर्वीसारखे आयुष्य देण्याचा निर्धार केला होता. वोक्हार्ट रूग्णालयात वेळीच उपचार मिळाल्याने आज आमचा भाऊ पुर्वीप्रमाणे सर्वसामान्य आयुष्य जगु शकत आहे. याकरिका आम्ही डॉ कोचर आणि डॉ विशाल सावळे यांचे विशेष आभार मानतो. स्ट्रोक झाल्यास त्याची गुंतागुंत कमी करण्यासाठी मी प्रत्येकाला वेळेवर हस्तक्षेप करण्याचे आवाहन करतो असे रुग्णाचा धाकटा भाऊ देवेंद्र बावसर यांनी सांगितले.