निमगाव गोंदगाव विविध कार्यकारी सोसायटी निवडणुकीत शिंदे गटाला धक्का
वैजापूर/प्रतिनिधी
वैजापूर तालुक्यातील निमगाव गोंदगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी शिंदे गटाला मोठा धक्का देत सार्वत्रिक निवडणुकीत दोन उमेदवाराला पराभवाची धूळ चाखली आहे मूळ शिवसेनेकडून परिवर्तन शेतकरी विकास पॅनल चे देविदास कचरू त्रिंबके व मालनबाई लहानु त्रिभुवन यांनी विजयी पताका फडकविला या विजयामुळे पंचक्रोशीत चर्चेला उधाण आला आहे.
निमगाव विविध कार्यकारी सोसायटी निवडणुकीत 13 सदस्य आहेत यापैकी दहा विविध प्रवर्गातील संचालकाची बिनविरोध निवड करण्यात आली होती शिवसेनेच्या वतीने देविदास कचरू त्रिंबके यांनी राखीव मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता तर महिला राखीव प्रवर्गातून मालनबाई लहानु त्रिभुवन यांनी नामनिर्देशन पत्र सादर केले होते या निवडणुकीत शिवसेनेला प्रतिनिधित्व देण्यास शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला होता हा विरोध जुगारून निवडणूक लढविण्याचा निर्णय उमेदवारांनी घेतला 3 नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत शिंदे गटाच्या दोन्ही उमेदवारांना अनुक्रमे 48 व 22 मतांनी पराभूत करून शिवसेनेचे वर्चस्व दाखवून दिले या विजयासाठी शिवसेनेच्या वतीने महेश कुमार पाटील यांनी पॅनलचे प्रतिनिधित्व केले निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून शेख फारूक अहमद केंद्र अध्यक्ष एस जे सरोवर एस ये डमाळे एस इ सोनवणे डीपी रावते सचिव एसटी घायवट यांनी काम पाहिले शिवसेनेच्या विजयी उमेदवारांचे स्वागत करून फटाकड्यांची अतिश बाजी करण्यात आली यावेळी निवडून आलेल्या उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली नवनिर्वाचन संचालक भाऊसाहेब त्रिभुवन अलका त्रिभुवन विजय इनामे विष्णू त्रिभुवन कडू कुमावत रामचंद्र नळे बिजलाबाई सामृत दत्तू समृत यांच्यासह गावकरी लहानु त्रिभुवन राजेंद्र दरेकर काकासाहेब सामृत कैलास सामृत सोमनाथ सामृत दादासाहेब नळे कडू त्रिभुवन विक्रम पंडीत नामदेव डघळे योगेश साळूंके अकुश त्रिभूवन अशोक डघळे माजी सरपंच गोरक कवडे आप्पा सामृत विजय त्रिभूवन राजेंद्र त्रिभूवन किशोर त्रिभूवन मोहन त्रिभूवन गणेश त्रिभूवन भारत ठोसरवालयांच्यासह गावकऱ्यांनी अभिनंदन केले