Subscribe to our Newsletter
Loading
उद्योगधंदे आणि बिजिनेस

मत्स्य व्यवसाय थांबला नाही, थांबणार नाही…..


अनादि काळापासून मत्स्य व्यवसाय हा पारंपारिक व्यवसाय आहे. अलिकडे या व्यवयसाला उद्योगाचे स्वरुप प्राप्त झाले आहे.  भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतीसोबत मत्स्य व्यवसायाची ही महत्वपूर्ण भूमिका आहे. महाराष्ट्रात कोकणाचे स्थान अग्रगण्य आहे

महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रात सुमारे ७२ मी. खोलीपर्यंत यांत्रिकी व बिगर यांत्रिकी नौकांद्वारे मासेमारी केली जाते. महाराष्ट्राच्या समुद्रकिना-यावर छोटी-मोठी १८४ बंदरे आहेत. 4 लाखांपेक्षा जास्त मच्छीमार मासेमारीचा व्यवसाय करतात, असे असले तरी मासेमारी व्यवसायाशी निगडित व्यवसाय करणा-यांची संख्या जास्त आहे. मासळीचे दरवर्षी उत्पादन ८.९ लक्ष टन एवढे घेतले जाते. माशांच्या निर्यातीद्वारे महाराष्ट्र सरकारला प्रतिवर्षी २ हजार कोटी रुपये एवढे परकीय चलन मिळते. महाराष्ट्र राज्यातील कोकण प्रांतालाच समुद्रकिनारा लाभला आहे. हा समुद्रकिनारा ७२० कि. मी. लांबीचा असून उत्तरेकडील झाई ते दक्षिणेकडील तेरेखोल खाडीपर्यंत या किना-याचा समावेश आहे. निसर्गाच्या कृपेने लाभलेल्या किनारपट्टीचा उपयोग येथील भूमिपुत्रांनी मत्स्योद्योगाच्या रूपात रोजगाराचे साधन म्हणून केला आहे. कोकणातील प्रमुख व्यवसाय म्हणून मत्स्य व्यवसायाला पाहिले जाते. अनेक शतकांपासून पारंपरिक पद्धतीने सुरू असलेली कोकणातील मासेमारी बदलत्या काळानुसार मासेमारीच्या साधनसामुग्रीत सुधारणा होऊन आज यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून प्रगती साधत येथील मच्छीमार उदरनिर्वाह करत आहेत. कोकणणातील या पारंपारीक व्यवसायाला पूरक व्यवसायाची जोड देण्यासाठी आणि मच्छीमार बांधवांना आर्थिक दृष्ट्या अधिक प्रबळ करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने फिश- ओ-क्राफ्टद्वारे रोजगार निर्मिती हा राज्यातील पहिला अभिनव उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. मत्स्य कातडीपासून वस्तु तयार करण्याचे प्रशिक्षण देऊन उद्योग सुरू करण्याला प्रोत्साहन देण्याचा राज्यात पहिल्यांदाच प्रयोग करण्यात येत आहे. राज्याच्या मत्स्यव्यवसाय विकास विभागाने उचललेले हे क्रांतीकारी पाऊल आहे. यामुळे नवयुवक आणि मच्छिमार महिलांना नवीन उद्योग व रोजगार प्राप्ती होणार आहे. या नव उद्योगाला शासन सर्वोतोपरी सहकार्य करणार आहे. मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते ‘फिश-ओ-क्राफ्ट ’ कौशल्य विकास या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.  दि. 2  व  3 डिसेंबर  रोजी मुंबईतील  तारापोरवाला मत्स्यालय येथे 40 ते 50 मच्छीमार बांधवांना या रोजगाराविषयी मोफत प्रशिक्षण देण्यात आले आहे. जागतिक स्तरावर माशांच्या कातड्यापासून विविध वस्तु बनविण्यात येतात. ‘फिश ओ क्राफ्ट’ या कौशल्यपूर्ण कार्यक्रमाद्वारे मच्छिमारांना आणि नव-तरूणांना नव-उद्योग करण्याची सुवर्णसंधी प्राप्त होणार आहे. मत्स्यव्यवसाय करण्याव्यतिरिक्त उद्योग करण्याची एक नवी संधी शासनाने उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी  विनामुल्य प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रमही राबविण्यात येत आहे. हा एक क्रांतीकारी उपक्रम असून, राज्यातील विविध जिल्ह्यातही हा उपक्रम पोहोचविण्याचा शासन प्रयत्न करीत आहे. मच्छीमारबांधव तसेच या व्यवसायातील यशस्वी व्यक्तींनी मत्स्यव्यवसाय विभागाच्या विकासासाठी असणाऱ्या नवीन सुचना शासनाला सुचवाव्यात, या सर्व सुचनांचे शासनामार्फत स्वागत केले जाईल.  माशांच्या कातडीपासून विविध वस्तु बनविण्याचा हा उपक्रम जास्तीत जास्त मच्छिमार बांधवांपर्यंत पोहोचल्यास एका नवीन उद्योगाचे पर्व सुरू करण्यास मदत होणार आहे.  यातून मच्छिमार बांधवांच्या विकासासाठी शासनामार्फत सर्वोतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत.

शासनाने या व्यवसायाच्या विकासाठी वर्षभरात विविध महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

 त्यात अरबीसमुद्रात निर्माण झालेल्या क्यार व महा या दोन चक्रीवादळामुळे मच्छीमारांना मासेमारी न करता आल्यामुळे झालेल्या नुकसानी बद्दल 65 कोटी इतके विशेष सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या व्यवसायातील पायाभूत सुविधांचा विकास साधण्यासाठी विशेष निधी  व विविध योजनांची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील सागरी भागात जेट्टीसह मत्स्यबंदरांचे बांधकाम व मासळी उतरवण्याची ठिकाणे विकसित करण्यात येणार. यासाठी पाचवर्षात 7 हजार 522 कोटींचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. मत्स्यउत्पादन दुप्पट करण्यासाठी राज्यात ‘प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना’ 2020-21 ते 2024-25 या पाचवर्षांच्या कालावधीसाठी राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सागरी जलायशय क्षेत्रात अवैध मासेमारी रोखण्यासाठी जेट्टी व प्रमुख मासळी उतरवण्याच्या केंद्रावर सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील सर्व मासेमारी नौकांवर सीसीटीव्ही व व्हीटीएस यंत्रणाबसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एल.ई.डी. दिव्यांच्या साहाय्याने होणारी अवैध पर्ससीनमासेमारी तसेच प्रतिबंधित असलेल्या मांगूरमाशाच्या उत्पादना विरुद्ध कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोविड काळात मंच्छीमांर बांधवांना दिलासा.

*मच्छीमार नौकांसाठीच्या डिझेल परताव्याच्या रकमेतून कर्जाचीवसुली न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

*तलावठे कर रक्कम भरण्यास व मासेमारीपरवान्यांच्या नूतनीकरणाला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. 

*मत्स्यबीज संचयनाची 10 टक्के आगाऊ रक्कम भरण्यासाठी तसेच भाडेपट्टीने देण्यात आलेल्या मत्स्यबीजकेंद्राची लॉकडाऊनकालावधीत येणारी चालूवर्षाची भाडेपट्टीची रक्कमभरणे या दोहोंसाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

राज्यात प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत विविध ठिकाणी प्रशिक्षण कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत आहे. कोकणाचा भागा असलेल्या मुंबईला 75 टक्के किनारा लाभला असून, मुंबई ही एक मोठी बाजारपेठ असल्याने हा उद्योग करताना मच्छिमार बांधवांना अडथळे येणार नाहीत. मत्स्य व्यवसायासाठी आपल्या कोकणात आवश्यक असणारी साधन संपत्ती विपूल प्रमाणावर उपलब्ध आहे. मत्स्य व्यवसाय व मत्सव्यसायाशी निगडीत पूरक व्यवसायातून शेतकरी, युवक आणि महिलांकरिता रोजगाराच्या नवनवीन संध्या विविध क्षेत्रांमध्ये मोठया प्रमाणावर तयार होत आहेत. शासनाच्या ‘फिश-ओ-क्राफ्ट ’ कौशल्य विकास या उपक्रमामुळे राज्यातील आणि वशेषत: कोकणातील मच्छीमार बांधवांना बेरोजगारी सारख्या समस्येवर मात करता येईल. ग्रामीण भागातील शेतकरी, युवक व महिलांना स्वयंरोजगार प्राप्त होईल व त्यांची आर्थिक स्थिती व जीवनमान उचांवेल.

            महाराष्ट्र शासन मच्छीमार बांधवांसाठी अनेक उपाययोजना आणि अर्थसहाय्य करीत असते.  स्वतंत्र विभागामार्फत शासनाचे संपूर्ण् लक्ष या व्यवसायाकडे आहे.  अजूनही अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. याकडे शासन गांभिर्याने पाहत आहे.  कोकणचा समृध्द मत्स्य व्यवसाय देशात अव्वल ठरविण्यासाठी शासनाने घेतलेले हे निर्णय भविष्यासाठी दूरगामी परिणाम करणारे ठरतील यात शंका नाही.

    प्रविण डोंगरदिवे माहिती सहाय्यय विभागीय माहिती कार्यालय कोकण विभाग, नवी मुंबई

******


जिल्हा माहिती कार्यालय, रायगड- अलिबाग

दुरध्वनी 02141-222019

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close