मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या हातात ‘मशाल’, तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ नाव
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या वादामध्ये निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं, त्यानंतर आता निवडणूक आयोगाने ठाकरे आणि शिंदे गटाला नवीन नाव दिलं आहे, तसंच ठाकरे गटाला नवीन चिन्हही देण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब आणि शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिलं आहे.
निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला धगधगती मशाल हे चिन्ह दिलं आहे, पण एकनाथ शिंदे गटाला अजून कोणतंही चिन्ह देण्यात आलेलं नाही. निवडणूक आयोगाने त्रिशूळ आणि गदा ही दोन्ही चिन्ह बाद केली आहेत. त्रिशूळाची शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटाकडून मागणी करण्यात आली होती. धार्मिक चिन्ह असल्यानं निवडणूक आयोगाने त्रिशूळ आणि गदा ही दोन्ही चिन्ह बाद केली आहेत. शिंदे गटाला निवडणूक आयोगाकडून नव्याने तीन चिन्ह द्यायला सांगण्यात आली आहेत.