तीन दिवसात दोन गडावर केली चढाई
mh20live Network – समुद्र सपाटीपासून तब्बल १ हजार ६४६ मीटर उंच असलेल्या कळसुबाई शिखर सातवी वर्गात शिकणाNया सायलीने — तासात सर केले. आश्चर्य म्हणजे तिने कळसूबाई सर करण्यापुर्वी आधीचे दोन दिवस हरिश्चंद्र आणि रतनगडालाही गवसणी घातली होती. सायलीचे साहस, क्षमता बघुन पर्यटकांनीही सॅल्यूट केला. लहान वयात तीन दिवस हा प्रवास करणाNया सायलीने सर्व विद्याथ्र्यांना आदर्श घालुन दिला.
इतिहासाचे धडे, गोष्टीतुन गड किल्याबाबत ऐकतांना लहानग्यांना नेहमीच कुतुहल वाटत असते. गड किल्ल्याकालीन इतिहासही रंजक असल्याने अनेक विद्यार्थी त्या इतिहासात — जातात. अनेकदा शाळेच्या सहलीतुन विद्याथ्र्यांना गड किल्ल्यावर जाण्याची इच्छा पुर्ण होते. अशा या विद्याथ्र्यामध्ये ध्येयवेडी असलेली सायलीच्या महत्वकांक्षाने तिला नेहमीच गड किल्ल्यावर जायला मिळते. वाळूज महानगरातील साईनगरात राहणारे दत्तू कचरू जाधव हे एका वंâपनीत काम करतात. त्यांना दोन अपत्य आहेत. यातील एक सायली ओर्चीड इंग्लिश स्वूâलमध्ये इयत्ता दुसरीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. दत्तु जाधव हे कुटुंबियांना घेवून सहा महिन्याला सहलीला जातात. राज्यातील गड किल्ल्यांची मुलांना ओळख व्हावी तसेच त्यांच्यात ऐतिहासीक वारसाची त्यांना जवळून ओळख व्हावी, असा त्यांच्या या सहलीमागील हेतू. सहामाही सहलीतुन त्यांनी अनेक किल्ल्यांना भेटी दिल्या.
— रोजी दत्तु जाधव ठरल्याप्रमाणे कुटुंबियासह नाशिक भागात सहलीला गेले. या सहलीत त्यांनी पहिला किल्ला निवडला तो हरिश्चंद्र गड. समुद्र सपाटीपासून १ हजार ४२२ मिटर उंचीवर असलेल्या गडावर चढाईसाठी सायली तयार झाली. ७ वर्षाच्या सायलीच सर केला.

त्यानंतर दुसNया दिवशी याच परिसरात असलेल्या रतन गड किल्ला सर केला. त्याची उंची समुद्रसपाटीपासून तब्बल १ हजार २९७ मिटर इतकी आहे. या दोन्ही गडावर पावसाळ्यात मोठी धुक्याची चादर पसरलेली असते. तसेच हे दोन्ही गड उंचीवर असल्याने हवेचे प्रमाण जास्त असते. सर्व अंतर पायी प्रवास करून जावे लागते. तसेच पावसाळ्यात अतंत्य अवघड आणि धोकादायक अशी ख्याती या दोन्ही गडाची आहे. सायलीने मात्र अत्यंत शिफारशीने, धैर्याने,जिद्दी न थकता दोन्ही गड सर केले.
दरम्यान, हे दोन्ही गड किल्ले पाहुन झाल्यानंतर तीसNया दिवशी म्हणजेच २४ सप्टेंबर रोजी कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर सर करण्याचा निर्णय घेतला. कळसूबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून १ हजार ६४६ मीटर आहे. दोन दिवस दोन्ही गड सर केल्यानंतरही कुठेही न थकता तिने कळसूबाईचे शिखर सर करण्याचा निर्धार केला. हे शिखर देखील न थकता तिने हसत खेळत व मोठ्या हिमतीने पार केला. तिच्या या कतृत्वाने तिचे शाळेसह सर्व स्तरातून कौतूक करण्यात येत आहे.