Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

धक्कादायक:घाटीत कोरोना रुग्णाकडुन तोडफोड,सलाईन स्टड फेकुन केली तोडफोड,

घाटीतील कोवीड केअर सेंटरला वाली कोण ?, डॉक्टर गायब 

औरंगाबाद/ प्रतिनिधी – घाटी रुग्णालयातील एका कोरोना वर उपचार घेत असलेल्या रुग्णाने कोरोना कक्षात तोडफोड करत थैमान घातले. ही धक्कादायक घटना आज रविवारी दि. ६ डिसेंबर रोजी घडली. या घटनेच्या वेळी कोवीड केअर सेंटरवर नियुक्त केलेले प्रमुख हजर नसल्याने घाटीतील या कोवीड केअर सेंटरला वाली कोण ? फक्त नावालाच जबाबदारी घेऊन पुुढे कर्ततव्य पार पाडाचे नाही का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, घाटी रुग्णालयातील कोवीड वार्डात कोरोना वर उपचार घेत असलेला एक रुग्ण अचानकपणे कोवीड वार्डातील स्टुल, सलाईन चे स्टॅण्ड इत्यादी साहित्य घेऊन वार्डात तोडफोड करत होता. यावेळी तो मला घरी जायचे आहे असे देखील म्हणत होता. त्या कोरोनाग्रस्त रुग्णाने स्टुल व सलाईन स्टॅण्डच्या सहाय्याने मुख्य दरवाजाच्या काचा फोडल्या. हे दृश्य पाहून तीथे उपस्थित असलेले ब्रदर्स आणि नर्स यांनी त्याला आवरण्याचा प्रयत्न केला पण तो मला घरी जायचे आहे असे म्हणत आणखी जास्त तोडफोड करत होता. हे सर्व बघुन तेथील ब्रदर्स व नर्स यांनी त्याला समजावले की उपचाराशिवाय घरी सोडता येणार नाही, परंतु त्याने मला घरी जाऊद्या असा तगादा लावून धरला. हे सर्व बघुन तेथील ब्रदर्स व नर्स यांनी घाटीतील कोवीड केअर सेंटरचे प्रमुख डॉ. चौधरी यांना बोलावले असता ते त्यावेळी तिथे उपस्थित नव्हते. त्यांना संपर्क केला असता त्यांचा फोन लागत नव्हता. त्यामुळे एकंदरीतच भयभीत झालेल्या सर्व नर्स व ब्रदर्स यांनी तेथील सुरक्षारक्षकाला बोलावले परंतु तो कोरोनाग्रस्त रुग्ण असल्याने त्याच्या जवळ जाण्याचे धाडस कोणी करत नव्हते.

एकीकडे शासनाच्या वतीने लाखो, करोडो रुपये खर्च करून नागरिकांच्या आरोग्यासाठी कोवीड केअर सेंटर उभारले आहे व त्याची जबाबदारी घाटी प्रशासनावर सोपविली आहे. तोच दुसरीकडे घाटी प्रशासनातील जबाबदार माणसे जर अशा घटनेवेळी हजर रहात नसतील तसेच एरव्ही समाजामध्ये डीन म्हणुन मिरविणाऱ्या घाटीच्या डीन मॅडमही वेळेवर हजर नाही, तर त्या कोवीड केअर सेंटरला वाली कोण ? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. एकंदरीत या सर्व प्रकरणामुळे तेथील ब्रदर्स व नर्स भयभीत झाले होते. तसेच अशाप्रकारे एखाद्या रुग्णाच्या तोडफोड केल्यामुळे व याप्रकारच्या वागण्याने जर एखाद्या कर्मचाऱ्याचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण ? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.‌ यासर्व प्रकरणामुळे एकीकडे शासन कोरोनाला आळा घालण्यासाठी घाटी प्रशासनावर जबाबदारी सोपवत आहे आणि दुसरीकडे तेथील जबाबदार डॉक्टर्स यावेळी अनुपस्थित राहत असल्याने शासनाने दिलेली जबाबदारी घाटी प्रशासन तेथील कोवीड केअर सेंटरचे प्रमुख डॉक्टर ही जबाबदारी खरच पार पाडत आहेत का ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

https://www.facebook.com/148479338522651/videos/397591324827195

आपली नियुक्ती असलेली जबाबदारी सोडून डॉ. चौधरी असे बेजबाबदार वागत असतील तर डॉ. चौधरी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये ? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. याशिवाय घाटीच्या प्रमुख आणि डीन पदावर विराजमान झालेल्या डॉ. कानन येळीकर यांची सुद्धा काही जबाबदारी नाही का ? असा प्रश्न कर्मचारी, सुरक्षारक्षक, नागरिक यांच्यामधुन उपस्थित केला जात आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close