औरंगाबाद, – लोकशाहीला अधिक सुदृढ करण्यासाठी जिल्ह्यातील मतदार यादी अधिक अचूक
करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सुनील चव्हाण यांनी मतदार नोंदणी
अधिकाऱ्यांना आज केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मतदार यादीबाबत श्री. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार
पडली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, संजीव
मोरे, जनार्धन विधाते, वर्षाराणी भोसले, रामेश्वर रोडगे, संगीता सानप, स्वप्नील मोरे, संदीप पाटील, माणिक
आहेर आदींसह सहायक मतदार नोंदणी अधिकारी आदींची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, मतदार याद्या अचूक असाव्यात. मतदार यादीमध्ये एका मतदाराचे
एकापेक्षा अधिक नावे, छायाचित्र असलेली नावे, छायाचित्रे वगळण्यात यावेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील 18
वर्षांवरील प्रत्येक मतदाराची मतदार नोंदणी करण्यात यावी. यामध्ये सर्व महिला, तृतीय पंथीय, दिव्यांगांचा
समावेश असावा. त्याचबरोबर मृत मतदार, स्थलांतरीत मतदारांची नावेही मतदार यादीतून वगळण्यात यावीत.
या मतदार यादीच्या कामास सर्वांनी प्राधान्य द्यावे, अचूकतेवर अधिक लक्ष द्यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी
सर्व अधिकारी यांना केल्या.
जिल्ह्यातील मतदार, मतदार यादीबाबत सविस्तर माहिती डॉ.कदम यांनी जिल्हाधिकारी चव्हाण यांना
सादर केली.