श्री संत शंकरस्वामी महाराज यांचा अखंड हरिनाम सप्ताह यावर्षी शिऊर गावात
सप्ताह पूर्व तयारी नियोजन बैठक संपन्न, विविध समित्या गठीत
शिऊर : वारकरी संप्रदायाच्या संत परंपरेतील महत्वाचे स्थान असलेल्या श्री संत शंकरस्वामी महाराज संस्थान चा फिरता नारळी अखंड हरिनाम सप्ताह या वर्षी शिऊर येथे होत आहे.
फिरता नारळी सप्ताहाचे हे २७७ वे वर्षे असून कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर हा सप्ताह व्यापक स्वरूपात होणार आहे.
शिऊर येथील श्री संत शंकरस्वामी महाराज मंगल कार्यालयात दिनांक २६ मे रोजी संस्थानचे अध्यक्ष एकनाथराव जाधव, उपाध्यक्ष सारंगधर महाराज भोपळे, सचिव बबनराव जाधव, कार्याध्यक्ष पोपटराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत सप्ताह पूर्व नियोजन बैठक संपन्न झाली.
दिनांक २ ते ९ ऑगस्ट दरम्यान हा सप्ताह शिऊर येथील स्वामी मंदिर परिसरात होणार असून या साठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या.
सप्ताहच्या अध्यक्षपदी एकनाथराव जाधव यांची तर उपाध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील पैठणपगारे, माजी सभापती सुभाषचंद्र जाधव यांची निवड करण्यात आली. या बैठकीत निधी संकलन, इंधन व्यवस्था, कीर्तन नियोजन, मंडप सजावट, भोजन, महाप्रसाद वितरण, स्वच्छता, प्रसिद्धी आदी समितीची निवड करण्यात आली.
अखंड हरिनाम सप्ताह साठी ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष एकनाथराव जाधव यांनी केले.
या बैठकीत माजी सरपंच नितीन चुडीवाल, तंटामुक्तीचे अध्यक्ष भास्कर जाधव, सुनील शिरोडे, प्रकाश लाखे, शिवाजी साळुंके, अनिल भोसले, भाऊसाहेब घोडके, चंद्रभान दादा चिकटगावकर, रामभाऊ महाराज मगर, प्रभाकर आढाव, कचरू जाधव, आव्हाळे नाना, सुशील देशमुख, सौरभ लाखे, संकेत चुडीवाल, दिलीप जाधव, पुंडलिक जाधव, रामभाऊ जाधव , पंडित देशमुख, दीपक गाजरे, सोना जाधव, अण्णा सूर्यवंशी आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.