प्रगती संस्था ३० अनाथ मुलांना दत्तक घेणार
औरंगाबाद- लहान मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी मॉटेसरी शिक्षक महत्त्वाची
भूमिका बजावतात. त्यामुळे इच्छा असलेल्या मुली व महिलांना प्रगती बहुउद्देशीय
सेवाभावी संस्थेतर्फे मोफत पशिक्ष्ण दिले जाणार आहे. यासह ३० अनाथ मुलांना शिक्षण देण्यासाठी दत्तक घेणार
असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रोहित गिरी यांनी पत्रकार परिषदेत दिली ते म्हणाले, जी मुले
अनाथ झाली आहेत अशा मुलांना शिक्षण देण्याचे कार्य प्रगती संस्था करणार आहे. त्याचबरोबर अनेक पालकांचे
रोजगार गेले आहेत. अशा पालकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी माँटेसरी
कोर्सची संधी संस्था देत आहे. त्यांच्या क्रिएटिव्हिटीला चालना देण्यासाठी माँटेसरी
शिक्षकांना तसे प्रशिक्षण दिले जाईल. यासाठी कोणतीही फी घेतली जाणार नाही, इच्छुकांनी
लवकरात लवकर नोंदणी करून प्रवेश घ्यावा. यासाठी
९८८१४७७७१९, ७७९८९७७२३७ या क्रमांकांवर संपर्क साधावा. कोर्स पूर्ण झाल्यावर अंगणवाडी, बालवाडी सुरू करण्यास मदत
करण्यात येईल, असल्याचेही गिरी म्हणाले. यावेळी श्वेता गिरी यांचीही उपस्थिती होती.