“धुमस” या चित्रपटाच्या यशानंतर शिवाजी दोलताडे “मजनू” हा चित्रपट घेवून येत आहेत. प्रेमाची अनोखी परिभाषा सांगणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी दोलताडे यांनी केले असून शिवाजी दोलताडे म्हणाले, की प्रत्येकजन कॉलेजला गेल्या नंतर स्वतःला मजनू समजतो जे लोक हा चित्रपट पाहतील. त्यांना त्यांच्या कॉलजेच्या दिवसांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. कोरोनाच्या काळात सर्व काळजी घेवून चित्रित झालेला हा चित्रपट आहे.
मजनू या चित्रपटाचे निर्माते गोवर्धन दोलताडे हे असून संगीतकार पी शंकरम् , सचिन अवघडे, साजन – विशाल, पार्श्वसंगीत पी. शंकरम्, विनीत देशपांडे यांचे आहे. तर गीतकार दीपक गायकवाड, गोवर्धन दोलताडे साजन बेंद्रे, गायक सलमान अली, आदर्श शिंदे, आनंदी जोशी, बेला शेंडे, संदीप उबाळे, विशाल चव्हाण हे आहेत.
प्रेमाची अनोखी परिभाषा सांगणारा हा मजनू चित्रपट १० जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. संपूर्ण कुटुंबातील सदस्यांना हा चित्रपट आवडेल.
“मजनू” चित्रपटात रसिकांना फाईट, एक्शन, रोमान्स तसेच लव्हस्टोरी अशा बऱ्याच गोष्टी पहायला मिळणार आहेत. चित्रपटाची पत्रकार परिषद दिनांक २५/०५/२०२२ रोजी मोहन नोव्हा मल्टिप्लेक्स येथे मल्टिप्लेक्स मालक अब्दुल रईस खान सर व मॅनेजर बाबर खान सर यांच्या सहकार्याने संपन्न झाली.