Subscribe to our Newsletter
Loading
आरोग्य व शिक्षणलाईफ स्टाईल

शरीरातील नैसर्गिक अँटीऑक्सिडंट ‘ग्लुटाथिओन’ने मिळवा उत्तम त्वचा!

शरीरातील नैसर्गिक अँटीऑक्सिडंट ‘ग्लुटाथिओन’ने मिळवा उत्तम त्वचा!

या अँटीऑक्सिडंटच्या गुणवैशिष्ट्यांनी सण-उत्सवांच्या काळात फिट राहत चेहऱ्याला बनवा तजेलदार!

मुंबई = सध्या सर्वत्र सण-उत्सवांचे वातावरण आहे. या काळात बहुतांश जण फिट राहत आपल्या ब्युटी-लुक्सबाबत विचार करतात. सण-समारंभात जाताना उत्साहाची पातळी जरा अधिकच असते, पण या अतिउत्साहाच्या भरात धावपळ, मेकअपच्या अतिरिक्त वापरामुळे आपल्या आरोग्यावर तसेच त्वचेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कृत्रिम, फिल्टर्ड लुक्सच्या वाट्याला न जाता आरोग्याची योग्य काळजी घेतली तर आपली त्वचा नैसर्गिकरित्याच सुंदर आणि तजेलदार दिसेल. आपल्या शरीरातच तयार होणाऱ्या ग्लुटाथिओन या मास्टर अँटिऑक्सिडंटमुळे ही किमया घडवता येऊ शकते!

काय आहे ग्लुटाथिओन?

ग्लुटाथिओन…हा खूप जड आणि क्लिष्ट शब्द वाटत असेल ना! पण हा घटक आपल्या प्रत्येकाच्या शरीरात असतो. ग्लुटाथिओन हा आपल्या शरीरातील भरपूर अँटिऑक्सिडंट्स असलेला घटक असून याबद्दल क्वचितच माहिती असेल. हे कशासाठी असते? असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल, तर याची एक मोठी यादीच आहे. यात असलेल्या घटकांमुळे शरीराची त्वचा तजेलदार, उजळ होतेच पण त्याचबरोबर याचा उपयोग शरीराची सुदृढता वाढविण्यासाठीही होतो. जसजसे सण-उत्सव जवळ येऊ लागतात तसतशी त्वचा उजळ करण्यासाठी आपण प्रयत्न करू लागतो. अर्थात, ही वेळ आहे समारंभ साजरे करण्याची आणि आपल्या व्यक्तिमत्वासह आत्मविश्वासाने सादर होण्याची. हे तुमच्या फिटनेस रुटिनसाठी तयार होण्याइतके सोपे आहे. ग्लुटाथिओन हा असा एक उपाय आहे, जो तुमची त्वचा नैसर्गिकरित्या उजळ ठेवेल. ”जसजसे वय वाढत जाते तसतसे शरीरात नैसर्गिकपणे असणाऱ्या ग्लुटाथिओनच्या पातळीमध्ये घट होत जाते. त्याचप्रमाणे जीवनशैली, झोपेचा पॅटर्न, तणावाची पातळी, उन्हाचा संपर्क इत्यादीमुळे शरीरातील ग्लुटाथिओनची पातळी कमी होत जाते. प्रदूषणामुळे होणाऱ्या प्रचंड नुकसानासोबतच, अति डिजिटल एक्स्पोजरमुळेही ग्लुटाथिओनचा ऱ्हास होण्याचा वेग वाढतो. त्यामुळे उजळपणा कायम ठेवण्यासाठी तुम्हाला ग्लुटाथिओन सप्लिमेंटेशनची सुरुवात करावी लागते. हे वेगवेगळ्या प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. हे आपण तोंडावाटे घेऊ शकतो किंवा त्वचेवर लावू शकतो. तोंडावाटे घेतल्याने याचा परिणाम दिसायला वेळ लागतो परंतु होणारा परिणाम हा पूर्ण शरीरासाठी अंतर्बाह्य उपयोगी असतो.” असे अॅड्रॉइट बायोमेड लि.चे सहसंस्थापक आणि संचालक सुशांत रावराणे यांनी सांगितले.

ग्लुटाथिओन वापरून उजळ त्वचा हवी? मग हे जरूर कराच!

काय करावे
१. ग्लुटाथिओन शक्यतो रिकाम्या पोटी घ्यावे.
२. उन्हात जाताना सनस्क्रीनचा वापर करावा.
३. संयम ठेवा. दृश्य परिणाम दिसण्यासाठी वेळ लागतो.
४. धुम्रपान आणि मद्यपान वर्ज्य करा.
५. सुदृढ जीवशैलीचा अंगीकार करा.
६. ताण कमी करा आणि ध्यानधारणा करा.

काय करू नये
१. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना भुलू नका.
२. सप्लिमेंट्सची निवड केवळ स्वस्त आहे म्हणून करू नका.
३. सल्ल्याशिवाय एकाच वेळी अनेक उत्पादने वापरू नका.

सनस्क्रीन, अँटिऑक्सिडंट्स, सप्लिमेंट्स आणि सौंदर्यप्रसाधनांचा त्वचेवर बराच परिणाम होत असतो. ग्लुटाथिओन वाढविण्यासाठीच्या नियोजनामध्ये ‘क’ जीवसत्वाची भर घातली तर परिणाम लवकर साध्य करता येऊ शकतो. सोशल मीडिया फिल्टरप्रमाणे तात्पुरता परिणाम करणाऱ्या झटपट उपायांपेक्षा स्मार्ट शाश्वत स्किन केअर सोल्युशन अधिक परिणामकार असेल. शेवटी, आंतरिक सौंदर्य एका दिवसात येत नाही. ग्लुटोन १००० हा उजळपणात भर घालणारा कम्पॅनियन असू शकतो. जलद परिणामांसाठी आणि ग्लुटाथिओन अधिक चांगल्या प्रकारे शोषले जावे यासाठी तुम्ही ते Escor-Z नैसर्गिक व्हिटॅमिन सी गोळीसोबत घेऊ शकता. ग्लुटाथिओनमध्ये जगात सर्वोत्तम असलेले जपामनधील सेट्रिया ग्लुटाथिओन आहे, ज्यामुळे त्वचेवर डाग पडणे, स्कीन टोन समान न राहणे, निस्तेज, काळे डाग, उन्हामुळे होणारे नुकसान या सारख्या समस्या हाताळल्या जातात आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढते. हा ग्लुटाथिओन सर्वात शुद्ध प्रकार आहे आणि त्यामुळे भारतातील तो ग्लुटाथिओनचा पहिल्या क्रमांकाचा ब्रँड आहे आणि याबाबत अजून एक चांगली बाब म्हणजे त्वचाविकारतज्ज्ञसुद्धा याची शिफारस करतात.

“ग्लुटाथिओन हे मानवी पेशींमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंट आहे. हा त्वचेला उजळवणारा घटक असल्याचे मानले जाते कारण ते मेलानिनला हलक्या रंगामध्ये परीवर्तीत करते. परिणामी, ते मेलानिन पिगमेंटची निर्मिती करणाऱ्या टायरोसिनेस या एन्झाइमला निष्क्रिय करते. हे सुरक्षित आहे आणि तोंडावाटे घेण्याच्या गोळ्या किंवा कॅप्सुलच्या प्रकारात त्वचेला एकसारखा स्कीन टोन देण्यास मदत करते. त्यामुळे त्वचेची काळजी घ्या आणि उजळ त्वचा प्राप्त करण्यासाठी ग्लुटाथिओन परिस स्पर्श करा. हा उजळपणा तुमच्या कुटुंबियांमध्ये आणि मित्र-मैत्रिणींमध्येही पसरवा आणि उत्तम आरोग्यासहा कायम उजळत राहा” असे स्कीन क्रेस्ट क्लिनिक आणि सैफी हॉस्पिटलमधील सल्लागार त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. प्रवीण बानोडकर म्हणाले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close