Subscribe to our Newsletter
Loading
क्रीडा व मनोरंजन

‘सोयरीक’ चित्रपटातील गोंधळाला अजयचा स्वरसाज

सोयरीक चित्रपटातील गोंधळाला अजयचा स्वरसाज

सध्या नवरात्रैात्सवाची लगबग सुरु आहे. आदिमायेचा जागर करत तिच्या शक्तीची उपासना या दिवसात प्रत्येकजण करीत असतो. गायक संगीतकार अजय गोगावले यांनीसुद्धा यल्लमा देवीचा जागर करीत तिचा गोंधळ घातला आहे. ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’ आणि ‘बहुरूपी प्रोडक्शन्स’ ची निर्मिती असलेल्या आगामी ‘सोयरीक’ या मराठी चित्रपटासाठी त्यांनी हा गोंधळ गायला आहे.

डोई धरीला धरीला आईचा देव्हारा,  भाळी लाविला लाविला देवीचा भंडारा

पाला लिंबाचा बांधिला, तुझा मळवट भरीला,  तुझी भरून गं वटी, तुला निवद दाविला

आई गोंधळ मांडिला ये गं तू जागरा,  येल्लू आईचा उधं उधं…..

असे बोल असणारा हा गोंधळ गीतकार वैभव देशमुख यांनी लिहिला असून संगीतकार विजय गावंडे यांनी संगीतबद्ध केला आहे. गोंधळाबद्दल बोलताना अजय गोगावले सांगतात की, ‘जोगवा’ नंतर ‘सोयरीक’ चित्रपटामुळे मला परत गोंधळ गाण्याची संधी मिळाली आहे. विजयसोबत याआधी काम केल्याने ‘मळवट’ या गोंधळासाठी छान ट्यूनिंग जमलं व हा गोंधळ गातानासुद्धा खूप मजा आली. घटस्थापनेच्या मुहूर्तावर रसिकांच्या भेटीला आलेल्या ‘अदिती म्युझिक’ कंपनीने या गाण्याचे हक्क घेतले आहेत.

आपल्यातल्या स्वार्थ अन निस्वार्थाची लढाई यात एक हलकी धूसर रेष असते त्यावर तुम्ही कसे उभे आहात? त्यावर तुमची ‘सोयरीक’ अवलंबून असते आणि तेच मांडायचा प्रयत्न ‘सोयरीक’ चित्रपटात करण्यात आला आहे. मकरंद माने लिखीत दिग्दर्शित आणि विजय शिंदे, शशांक शेंडे, मकरंद माने निर्मित ‘सोयरीक’ हा कौटुंबिक धाटणीचा मनोरंजक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close