Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचा सोमवारी कडकडीत बंद

लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचा सोमवारी कडकडीत बंद

उत्तरप्रदेशातील लखीमपुर खेरी येथे घडलेल्या घटनेनेमुळे देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला असून हा अतिशय निंदनीय प्रकार आहे. या घटनेच्या निषेधार्थ शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने सोमवारी दिनांक 11 ऑक्टोबर रोजी दिवसभर कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या वतीने बैठकीत घेण्यात आला.
बैठकीत शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे ,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार जिल्हाध्यक्ष कल्याण काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, शहर जिल्हाध्यक्ष विजय साळवे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष कदीर मौलाना, काँग्रेस शहरध्यक्ष हीशाम उस्मानी, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, जिल्हा सरचिटणीस राहुल सावंत ,शिवसेनेचे शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे विश्वनाथ स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बंद मध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांसह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष ,सर्व व्यापारी संघटना ,सर्व अंगिकृत संघटना, सामाजिक संघटना सहभागी होणार आहे. महाविकास आघाडीच्या वतीने लखीमपुर येथील घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या या बंद मध्ये जनतेने उत्स्फूर्त पणे सहभागी होण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close