Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

जिल्हातील पर्यटन स्थळे नियमित वेळेत खुली ठेवण्याबाबत सुधारित आदेश निर्गमित

            औरंगाबाद,: कोविड-19 संसर्ग साखळी तोडणे बाबतचे सविस्तर सुधारित आदेश 06 ऑक्टोंबर 2021 रोजी जिल्हा प्रशासनाकडून प रित करण्यात आले आहेत. या संदर्भात सदर आदेशाद्वारे सुधारणा अधीक्षक, पुरातत्व औरंगाबाद कार्यालय यांच्याकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार करण्यात येत आहे. शासन आदेशानुसार संसर्ग साखळी तोडणे सुधारित आदेशानुसार सर्व जिल्ह्यांना दिलेल्या सुधारित अटी व शर्तीचा अवलंब अनिवार्य करणे बाबत निर्देश दिलेले आहेत.

                  शासन निर्णयानुसार औरंगाबाद जिल्हा क्षेत्रात कोविड-19 करिता आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास संपूर्ण जिल्हा क्षेत्राकरिता स्थानिक पातळीवर कोविड-19 संसर्ग साखळी तोडणे सुधारित आदेश व कोरोना विषाणू प्रार्दुभाव रोखण्याकरिता पुढील आदेशापर्यंत पुढील प्रमाणे निर्बंध बाबत सुधारित आदेश लागू करण्यात येत आहेत.

                  औरंगाबाद जिल्ह्यातील बीबी का मकबरा, औरंगाबाद लेणी, वेरुळ लेणी, अजिंठा लेणी आणि दौलताबाद किल्ला आदी पर्यटनस्थळे सुर्योदय ते सुर्यास्त (केंद्र शासनाच्या पुरातत्व विभागाच्या नियमित वेळेप्रमाणे) चालू ठेवण्यासाठी मुभा राहिल. उपरोक्त वेळेत सर्व पर्यटकांसाठी पर्यटन स्थळे खुले राहतील.

                  या सर्व बाबींसाठी कोविड योग्य वर्तन जसे की, मास्क वापरणे, 2 गज दुरी (6 फुट अंतर), सॅनिटायझर, आवयकतेनुसार फेसशिल्ड वापरणे अनिवार्य राहिल. सदर आदेशाची अंमलबजावणी 10 आॉक्टोंबर 2021 च्या सकाळी सुर्योदयापासून ते पुढील आदेशापर्यंत लागू राहिल. सदर आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधित आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 तसेच साथरोग कायदा 1897 अन्वये दंडनीय/कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहिल असे सुनील चव्हाण, जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण औरंगाबाद यांनी सुधारित आदेशान्व्ये कळविले आहे. 

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close