Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

रमोद धोंगडे यांचा जिल्हा माहिती अधिकारी जालना पदावर पदोन्नती निमित्त सत्कार

औरंगाबाद, दि.04, :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मराठवाडा विभागाचे सहाय्यक संचालक प्रमोद धोंगडे यांची जिल्हा माहिती अधिकारी, जालना या पदावर पदोन्नती झाली यानिमित्ताने विभागीय माहिती कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय व माहिती केंद्र औरंगाबाद कार्यांलयाकडून आज श्री.धोंगडे यांचा यावेळी सत्कार करुन त्यांना निरोप देण्यात आला.

खडकेश्वर येथील संचालक कार्यालयात आज श्री. धोंगडे यांचा जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत यांनी पुष्पगुच्छ व भेटवस्तु देऊन स्वागत केले. याप्रसंगी माहिती अधिकारी मीरा ढास, माहिती सहायक संजीवनी जाधव, श्याम टरके, तसेच तिन्ही कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. 

मराठवाडा विभागाच्या  सहाय्यक संचालक पदाची सुत्रे जिल्हा माहिती कार्यालयातील माहिती अधिकारी मीरा ढास यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

            श्री.धोंगडे यांनी यापूर्वी मंत्रालय, हिंगोली, अकोला, अमरावती, आदी ठिकाणी विविध महत्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close