Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

ग्वालियर येथे अखिल भारतीय संत समिती मध्यप्रदेश प्रांतची महत्त्वपूर्ण बैठक

MH20LlV NETWORK


 महाराष्ट्रातील फैजपूरच्या दोघा महामंडलेश्वरांची उपस्थिती
 विशाल जाधव/सिल्लोड
 अयोध्या येथे निर्माण होत असलेले श्रीराम मंदिर तसेच देशातील मठ, मंदिरांची सुरक्षा, हिंदू संस्कृतीवर होत असलेलं आक्रमण, आणि देशाच्या विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यासाठी अखिल भारतीय संत समितीची महत्त्वाची बैठक दंदरोआ धाम (डॉ.हनुमान) ग्वालियर, मध्यप्रदेश येथे पार पडली. या बैठकीला संत समिती निर्देशक महामंडलेश्वर स्वामी धर्मदेवजी महाराज हरियाणा, महामंत्री श्री. जितेंद्रानंदजी महाराज, राष्ट्रीय कोषाध्यक्ष महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज फैजपूर, महामंडलेश्वर श्री. रामदासजी महाराज ग्वालियर, महामंडलेश्वर राधे राधे बाबा इंदौर, महामंडलेश्वर पुरुषोत्तम दासजी महाराज फैजपूर, महंत अरुणदासजी महाराज हरिद्वार यांच्यासह देशभरातील संत महंत उपस्थित होते. आपल्या खान्देशचे मानबिंदू फैजपूर येथील संतपंथ मंदिर संस्थानचे गादिपती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज व खंडोबा महाराज देवस्थानचे गादीपती महामंडलेश्वर १००८ श्री पुरुषोत्तमदासजी महाराज यांची विशेष उपस्थिती होती. याप्रसंगी महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी हिंदू धर्म व संस्कृती रक्षा याविषयी बैठकीत सविस्तर मार्गदर्शन केले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close