Subscribe to our Newsletter
Loading
Uncategorized

सिल्लोड मध्ये शिवसेनेचे वर्चस्व कायम नगरपरिषद विषय समिती सभापती निवडणूक बिनविरोध


    सिल्लोड (प्रतिनिधी) दि.20, सिल्लोड नगरपरिषद विषय समिती निवडणूक प्रक्रिया पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सदरील विषय समिती निवडणूक बिनविरोध पार पडल्याने महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे नेतृत्व असलेल्या सिल्लोड नगर परिषदेत शिवसेनेचे वर्चस्व कायम राहिले आहेत.                सिल्लोड नगरपरिषदेच्या विषय समितीची प्रक्रिया गठीत करण्यासंदर्भात नगरपरिषद सभागृहात सोमवार ( दि 20 )रोजी उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अकरा वाजेपासुन प्रारंभ होऊन निवड प्रक्रिया पार पडली. 
     निवडण्यात आलेल्या समित्यांचे सभापती व सदस्य पुढीलप्रमाणे आहे.  ( 1 ) श्रीमती राजश्री राजरत्न निकम पदसिद्ध सभापती(2) सार्वजनिक बांधकाम समिती सभापती – अब्दुल समीर अब्दुल सत्तार, (3) शिक्षण समिती सभापती – श्रीमती कल्यानीताई राजेंद्र गौर , (4) स्वच्छता वैद्यक आणि आरोग्य समिती सभापती – जुम्मा खा गुलशेर खा पठण  (5) पाणीपुरवठा व जलनि:सारण समिती सभापती – सुधाकर पंडितराव पाटील  (6) नियोजन व विकास समिती सभापती – नंदकिशोर विठ्ठलराव सहारे  (7) महिला व बालकल्याण समिती सभापती – शबानाबेगम शेख बाबर  तर (8 ) महिला व बालकल्याण समिती उपसभापती – महेजबीन अकिल वसाईकर , श्रीमती कडूबाई विठ्ठल सपकाळ व मिर्झा चांदबेग उस्मान बेग यांची स्थायी समिती सदस्य पदी निवड झाली.
         सिल्लोड नगरपरिषद  विषय  समिती  निवडणुकीत सर्व विषय समिती सभापती निवडणूक बिनविरोध पार पडली. यावेळी सभापती सदस्यांचे महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम, युवानेते तथा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर ,मुख्याधिकारी सय्यद रफिक,  नवनिर्वाचित सभापती नंदकिशोर सहारे, जुम्मा खा पठाण, सुधाकर पंडित, शबाना बेगम शेख बाबर, महेनबीन अकिल वसईकर, कल्याणी गौर, सुधाकर पाटील, यांच्यासह नगरसेवक कडूबाई सपकाळ, महेजबीन वसईकर, शकुंतलाबाई बन्सोड, मालतीताई डोभाळ, रुउफ बागवान, शंकरराव खांडवे, सत्तार हुसेन, प्रशांत क्षीरसागर,जितू आरके, शेख सलीम हुसैन, सुनील दुधे,रईस मुजावर,शेख मोहसिन,राजू गौर,आसिफ बागवान,मतीन देशमुख,रतन डोभाळ, सविता झंवर, अकील वसईकर,मोईन पठान, उपमुख्याधिकारी अजहर पठाण,  आदिंची उपस्थिती होती.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close