Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

केसापुरीचे सरपंच प्रतिनिधी अंकुश राठोड यांचा खून

एक महिन्यापासून बेपत्ता ; मृतदेह गोदावरी पात्रात मोटार सायकलसह टाकला ; आरोपीची कबुली…

माजलगाव /रविकांत उघडे
येथील केसापुरी ग्रामपंचायतीचे सरपंच प्रतिनिधी व
ऊसतोडणी कामगारांचे मुकादम अंकुश भाऊराव राठोड वय 45 वर्षे रा.केसापुरी तांडा हे मागील एक महिन्यापासून बेपत्ता होते.महिनाभरापासून त्यांचा सर्वत्र तपास सुरु होता.त्या प्रकरणात एका संशयित आरोपीस ताब्यात घेण्यात आले होते.तब्बल एका महिन्यानंतर सदरील आरोपीने पोलिसांसमोर खून केल्याची कबुली दिली असून सदरील मृतदेहासह मोटरसायकल सावंगीच्या पुलावरून गोदावरी नदी पात्रात टाकून दिली.पोलिसांनी दि.3 गुरुवार रोजी सदर ठिकाणी जावुन मृतदेहाचा शोध सुरु केला परंतु उशिरापर्यंत मृतदेह सापडला नसून शोध सुरु आहे.यातील आरोपी एकनाथ रामेश्वर चव्हाण, महादेव रुपचंद चव्हाण,सुनीता एकनाथ चव्हाण सर्व रा.कोकाटे हादगाव ता.परतूर जिल्हा जालना येथील असून आरोपी विरुद्ध 302 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपींना सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून सदरील प्रकरणाचा तपास जालना पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाकडे आहे.

याबाबत आधिक माहिती अशी की,माजलगाव तालुक्यातील केसापुरी (तांडा) येथील ऊसतोडणी मुकादम अंकुश भाऊराव राठोड हे मोटरसायकल क्र.एम.एच.23 ए.एल.9274 वरुन 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 9:30 वाजणेच्या सुमारास ऊसतोडणीच्या कामासाठी कोयते बांधण्यासाठी (मजूर) व सोबत एका ड्रायव्हर आणण्यासाठी वाटूर फाटा ता.परतूर जिल्हा.जालना येथे गेले होते.परंतु ते पुन्हा परत आले नाही.म्हणून माजलगाव ग्रामीण पोलीस ठाणे येथे येवून मुकादम अंकुश राठोड बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.या प्रकरणाचा तपास आष्टी पोलिसाकंडे देण्यात आला होता.सदर प्रकरणात पोलिसांनी तपास केला असता त्यांच्या नात्यातीलच व्यक्तीला ताब्यात घेवून त्याची चौकशी केली असता व्यक्तीने मुकादम अंकुश राठोड यांचा खून केल्याची कबुली देत मृतदेह सांगवी येथील गोदावरी नदी पात्रात फेकुन दिल्याचे सांगितले.त्या -नंतर पोलिसांनी घटनास्थळी जावुन पाहणी केली असता त्यांना राठोड यांची मोटारसायकल आढळुन आली.मात्र अंकुश राठोड यांचा मृतदेह सापडला नसुन शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. ज्या ठिकाणी गाडी आढळून आली आहे.त्या नदी परिसरात नावेने आणि चप्पुच्या सहाय्याने शोध सुरू आहे.
Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close