Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

कन्नड तालुक्यात मूसळधार पावसाचा हाहाकार

कन्नड तालुक्यात मूसळधार पावसाचा हाहाकार

कन्नड, पिशोर, नाचनवेल, करंजखेड, चिंचोली मंडळात अतिवृष्टी – 
नागद येथील भिलदरी पाझर तलाव फुटला – औट्रम घाटात दरड़ कोसळली – ट्रक वर दगड कोसळल्याने आठ म्हशी सह ट्रक चालक मृत्युमुखी 
कन्नड /प्रतिनिधी
  सलग दोन आठवड्यांपासून दडी मारून बसलेला पाऊस सोमवारपासून पुन्हा परतला आहे. मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून, आज पहाटेपर्यंत मुसळधार पाऊस बरसल्याने औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यामुळे कन्नड-चाळीसगाव मुख्य घाटमार्गावर दरड कोसळून , झाडे उन्मळून पडल्याने हा मार्ग बंद झाला आहे.एका ट्रक वर मोठाले दगड कोसळल्याने त्यातील आठ म्हशी सह ट्रक चालक मृत्युमुखी पडला आहे. तालुक्यातील पाझर तलावही ओव्हरफ्लो झाला आहे. दरम्यान, रात्रीतून झालेल्या पावसामुळे कन्नड तालुक्यातील मंडळातील खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.
जिल्ह्यात पुन्हा जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. सुमारे आठ तासांपासून सर्वच तालुक्यात पाऊस बरसत आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. तर काही मंडळांमध्ये मंगळवारी पहाटेपासून संततधार पावसास सुरुवात झाली आहे.
तालुक्यात मध्यरात्री पासून सर्वत्र मुसळधार पाऊस पड़त असून याची सर्वाधिक झळ नागद परिसराला बसली आहे. कन्नड – ११० मि.मि,  पिशोर – १०४ मि.मि, नाचनवेल – ८३ मि मि, करंजखेड – ६२ मि.मि, चिंचोली – ११२ मि.मि मंडळात अतिवृष्टी पावसाची नोंद झाली आहे. कन्नड चाळीसगांव औट्रम घाटात दरड़ कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली असून या महामार्ग वरुन कुणीही प्रवास करू नये अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता महेश पाटील यांनी दिली आहे. 
नागद पाण्याखाली-तालुक्यातील नागद भाग सर्वाधिक प्रभावित झाला असून ,बसस्थानक परिसरातील बरीच दुकाने, घरे पाण्याखाली गेली असून अनेक टपऱ्या पुरात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. नागद -कन्नड  रस्ता खचला आहे. परिसरातील भिलदरी पाझर तलाव फुटल्याने शेतात व गावात पाणी शिरल्याने केळी, कापूस आदि.पीके जमीन दोस्त झाली असून विद्युत खांब पडल्याने विद्युत पुरवठा बंद झाला आहे. तर विद्युत  डीप्या देखील वाहून गेले असल्याची माहिती समोर येत आहे.महावितरण चे देखील मोठे नुकसान झाले आहे.तालुक्यातिल सर्वच नदया नाले यांना पुर आला असून नागद येथे पाण्यात शेकडो गुरे वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे. मुसळधार झालेल्या पावसाने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.अनेकांच्या घरात देखील पाणी गेल्याने संसारपयोगी वस्तू चे नुकसान झाले आहे.
कन्नड-चाळीसगाव घाटात दरड कोसळल्याने रस्ता बंद
पावसामुळे चाळीसगाव हद्दीतील कन्नड-चाळीसगाव घाटात दरड कोसळल्याने हा रस्ता बंद झाला आहे. शिवाय या तालुक्यातील पाझर तलावासह आजुबाजूचे काही तलावही ओव्हरफ्लो झाले आहेत. त्यामुळे गावात व शेतामध्ये पाणी साचले आहे. चाळीसगांव घाट बंद झाल्याने पर्यायी रस्ता म्हणून कन्नड- पानपोई- चापानेर- शिवूर बंगला-नांदगांव-चाळीसगांव अशी वाहतूक सुरु झाली आहे.

तलाठी,मंडळ अधिकारी,कृषी विभागाचे कर्मचारी पंचनामे करत आहेत.तर कन्नड घाटात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण,उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते,तहसीलदार संजय वारकड,नायब तहसीलदार हरून शेख , महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता महेव पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. जेसीबी,क्रेन च्या साहाय्याने रस्ता सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालक कोळी, उपनिरीक्षक भिवसने,वाहतूक शाखेचे श्री.सुरासे यांच्या सह पोलिसांची मोठी कुमक मदतकार्य करत आहे.

नागरिकांनी रेस्क्यू करून पूजाऱ्यांना घराबाहेर काढले सुखरूप-नागद येथील बालाजी मंदिर नदी लगत आहे तर त्यांचे पुजारीही नदी काठी राहतात गडदगड नदीला पूर आल्याने मंदिराच्या पायरीला पाणी लागके तर पुजारी यांच्या घरात पाणी शिरले रात्री 3 वाजेच्या सुमारास नागरिकांनी घराच्या छतावरील लोखंडी गज तोडून त्यांना सुखरूप बाहेर काढल
तालुक्यातील बरीच धरणे ओव्हर फ्लो तर काही भरण्याचा मार्गावर-तालुक्यातील पूर्णा नेवपूर मध्यम प्रकल्प , तपोवन निंभोरा लघु प्रकल्प , गंधेश्वर प्रकल्प , भरले असून अंबाडी , पिशोर अंजना प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहेत अंजना, पूर्णा, गडदगड, अंबाडी, शिवना, ब्राम्हणी,  गांधारी नदयांना महापूर आला असून गडदगड नदीवरील भिलदरी (नागद) पाझर तलाव फुटल्याने नागद गावात पाणी शिरले तर कन्नड नागद रस्ता खचला आहे , यामध्ये नदीकाठच्या राहीवाशांना  ग्रामस्थांनी रेस्क्यू करून घराबाहेर काढले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close