Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

तरुणांची गळफास घेऊन आत्महत्या तालुक्यातील जेऊर येथील घटना

कन्नड / प्रतिनिधी   तेविस वर्षीय तरुणांनी कांघाच्या चाळीत गळफास घेऊन आत्महत्या केल्यांची घटना तालुक्यातील जेऊर येथे घडली असून आत्महत्या करणाऱ्या युवकांचे मंगेश राजेंद्र रिंढे असे असून याप्रकरणी देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात अकस्मात नोंद घेण्यात आली आहे .याबाबत अधिक माहिती अशी की तालुक्यातील जेहुर येथील मंगेश राजेंद्र रिंढे (वय २३) या तरुणाने स्वताच्या राहत्या घराच्या शेजारी असलेल्या कांद्याच्या चाळीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गट क्रमांक ८६ मध्ये मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. मंगेश व त्यांची आई गेल्या कित्येक वर्षांपासून जेहुर शिवारातील गट क्रमांक ८६ मध्ये स्वताच्या शेतातील घरात राहत होते. दोन दिवसापूर्वी रक्षाबंधनाच्या सनासाठी बहिण आली असल्याने रात्री उशीरापर्यंत गप्पा गोष्टी झाल्या व तो दररोजच्या नित्यनेमाप्रमाणे घराला अगदी लगत असलेल्या कांद्याची असलेल्या चाळीत झोपायला गेला. सकाळी बहिण उठली आणि ती आपल्या चुलत्याकडे भेटण्यासाठी गेली. तोपर्यंत तो अंथरुणावर झोपलेला होता. बराच उशीर झाला म्हणून आई लेकीला बोलवायला गेली तिकडून येताना कांदाच्या चाळीत मंगेशने स्वताला दोरीने  लटकून घेतल्याचे बघितले. आईने आणि बहिणीने आरडाओरड केली. शेजारी असलेले नातेवाईक लटकलेला मंगेशला खाली घेतले परंतु तोपर्यंत मंगेश यांची जीवनज्योत माळवली होती. नातेवाईकांनी औराळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह आणला असता वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदिप कांबळे यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.  मुत्युचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसुन  देवगाव रंगारी  पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मुत्युची नोंंद करण्यात आली आहे.  पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार  शिवनाथ आव्हाळे, विजय धुमाळ करत आहे.   

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close