अपस्टॉक्सने भारतात इक्विटी सहभाग वाढवण्यासाठी सुरु केली ‘ओन युवर फ्यूचर‘ मोहीम
मुंबई | मार्च 30, २०२२: अपस्टॉक्स या भारतातील सर्वात मोठ्या गुंतवणूक प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या कंपनीने “आपल्या भविष्याचा ताबा घ्या” – ‘Own Your Future’ ही आपली इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२२ साठीची मोहीम आज सादर केली. तरुण भारतीयांना इक्विटी मार्केटमध्ये सहभागी होण्यासाठी; हुशारीने गुंतवणूक करण्यासाठी; कालांतराने वाढणारी स्वतःची मालमत्ता मिळवून देण्यासाठी प्रेरित करणे आणि त्यांना स्वतःच्या भविष्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत करून देशातील आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन देणे, हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.
कोणत्याही कंपनीचे आणि तिच्या व्यवस्थापनाचे उद्दिष्ट, आपल्या भागधारकांचे मूल्य वाढवणे हेच असते. या नव्या मोहिमेमध्ये हलक्याफुलक्या व्हिडिओंच्या मालिकेचा समावेश आहे, ज्यामध्ये कशाप्रकारे एखादी व्यक्ती “आपल्या आवडत्या कंपन्यांना आपल्यासाठी काम करायला लावते”, त्यांचे स्टॉक खरेदी करून, त्यांचे समभागधारक बनून आणि अशा प्रकारे आपला परतावा सुधारण्यासाठी त्या कंपनीला आणि तिच्या व्यवस्थापनाला कामाला कसे लावू शकते हे दाखविण्यात आले आहे.
अपस्टॉक्सच्या सह-संस्थापक कविता सुब्रमण्यन म्हणाल्या, “ ‘ओन युवर फ्युचर’ या मोहिमेचा हेतू अधिकाधिक भारतीयांना इक्विटी मार्केटमध्ये सहभागी होण्यासाठी आणि अपस्टॉक्सच्या माध्यमातून योग्य गुंतवणूक निवडी करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा आहे. तरुण भारतीयांना आज कंपन्यांमधील समभागांची खरेदी करून त्याद्वारे मालमत्तेची मालकी मिळविण्याचे आणि पोर्टफ़ोलिओ उभारणी करण्याचे महत्व समजते आहे. स्टार्टअप संस्कृतीत खूप मोठी वाढ झाली आहे आणि तरुणांना हे समजले आहे की जरी प्रत्येकजण उद्योजक होऊ शकत नसला तरीही, तुम्ही त्या कंपनीचा हिस्सा विकत घेऊ शकता आणि तिच्या दीर्घकालीन वाढीमध्ये भाग घेऊ शकता.”