Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

कोरोना काळातील घरपट्टी , नळ पट्टी माफ करा ! भाजपाचे अनंत गोलाईत यांनी केली मागणी.

mh20live Network

मानवत / अनिल चव्हाण

संपूर्ण देशात कोविड १९ या संसर्ग जन्य साथ रोगामूळे नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने केंद्र व राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून लाॅक डाऊन आदेश जाहिर करून सगळी कडे बंद केल असल्या मूळे शहरातील अर्थ व्यवस्था कोलमडली तर अनेक उद्योग व व्यवसाय बंद पडल्याने या काळात जनतेला अनेक समस्यांचा सामना करावा लागेल म्हणून केंद्र व राज्य सरकारने राज्यातील जनतेला दिलासा म्हणून मोफत अन्न धान्याचा पूरवठा करण्यात आला. कोरोना कोविड १९ या साथ संसर्ग रोगा मूळे अनेक उद्योग बंद झाले त्या मूळे सामान्य नागरीकांना या काळात अनेकांना संकटाचा सामना करण्याची पाळी आली.
सरकारच्या विविध कल्याणकारी योजनेमूळे नागरीकांना दिलासा मिळाला अनेक योजने मधून नागरीकांना सुट देण्यात आली.
या धर्तीवर मानवत नगर परिषदेने , कोरोना कोविड १९ या संसर्ग जन्य साथ रोगाच्या काळातील मानवत शहरातील नगर परिषदेच्या हद्दीत वास्तव्याला असलेल्या नागरीकांच्या घर पट्टी व नळ पट्टी माफ करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे माजी मानवत तालूका अध्यक्ष अनंत गोलाईत यांनी मानवत नगर परिषदेचे मुख्याधिकारी जयवंत सोनवणे यांच्या कडे एका निवेदना द्बारे केली.


Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close