कार्टून नेटवर्क च्या ‘ रीड्रा युअर वर्ल्ड ’ मोहिमे च्या माध्यमातून ब्रॅन्ड साजरा करणार प्रत्येक मुलातील अनोखे गुण
मुंबई, ३० मार्च २०२२- आता रीड्रा युअर वर्ल्ड ची वेळ आली आहे. भारतातील आघाडीचे मुलांचे मनोरंजन चॅनल असलेल्या कार्टून नेटवर्क ने आज त्यांच्या नवीन ब्रॅन्ड मोहिम आणि टॅगलाईन – रीड्रा युअर वर्ल्ड असलेल्या मोहिमेची सुरूवात करून मुलांमधील बाल्याला सातत्याने प्रोत्साहीत करून त्यांच्यातील बदलाचा खरा परिणाम होऊन त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवण्यावर भर दिला आहे. या मोहिमेचे परफेटी व्हॅन मेले इंडिया प्रेसेन्टीन्ग स्पॉन्सर असून ते त्यांच्या उन्हाळयातला विविध की टेन्टपॉल्स, फ्लॅगशिप स्कूल कॉन्टॅक्ट प्रोग्रॅम आणि वर्षाच्या अखेरचे सण-उत्सवमध्ये भागीदारी असतील. ३० मार्चपासून मुले आणि त्यांचे परिजन आता संपूर्णत: नवीन लुक आणि फील युक्त अशी कार्टून नेटवर्क हा चॅनेल अतिशय सक्षम अशा रंगांनी, संगीताने आणि डिझाईनने युक्त होणार असून त्याचबरोबर नवीन कार्यक्रमांचीही मेजवानी मिळणार आहे.
रीड्रा युअर वर्ल्ड ची भारतात सुरूवात करण्याची घोषणा करतांना कार्टून नेटवर्क आणि कम्पॅनियन चॅनल पोगो चे दक्षिण एशिया नेटवर्क चे प्रमुख अभिषेक दत्ता यांनी सांगितले “ रीड्रा युअर वर्ल्ड या मोहिमेची सुरूवात करून आम्ही आता मुलांना त्यांचा अनोखा आनंद, त्यांच्या छोट्या कृतींना बळ देते आणि कथाकथनाला प्रोत्साहन देण्याचा आनंद वाढवणार आहोत. यामुळे आमची भारतातील कंटेंट विषयीची वचनबध्दता वाढून परिवारांशी संबंधित सांगणे हे अधिक चांगले होऊन प्रसिध्द आणि आयकॉनिक पात्रे निर्माण करून आम्ही साहस आणि शूरता यांना प्रोत्साहन देत आहोत.”
या मोहिमेचा एक भाग म्हणून मुलांना आता नवीन आणि आकर्षक कथांबरोबरच रंगीबेरंगी ॲनिमेशन पात्रांनी युक्त शोज पहायला मिळतील जसे Ekans – Ek Se Badhkar Snake, Dragon Ball Super, Digimon Adventure एम्मी नॉमिनेटेड सिरीज Lamput, The Powerpuff Girls, Ben 10, Tom and Jerry आणि DC Super Hero Girls इत्यादी. मुले आणि मुली दोन्ही प्रेक्षकांना आवडतील असे डिझाईन केलेले हे शोज आहेत. Cartoon Network कडून या अंतर्गत २०० हून अधिक तासांचा नवीन कंटेंट उपलब्ध करून देण्यात येत असून यांत ओरिजिनल होम ग्रोन सिरीज, आंतरराष्ट्रीय शोज, ॲक्विझिशन आणि स्पेशल्स इत्यादींचा समावेश आहे. चॅनल कडून प्री स्कूलर्स साठी विशेष ब्लॉक Cartoonito ची सुरूवातही या वर्षाच्या शेवटी करण्यात येणार आहे.
लवकरच या “रीड्रा युअर समर” मोहीम अंतर्गत, Perfetti Van Melle India च्या Center Fruit ने प्रस्तुत केलेले, ब्रॅन्ड तर्फे फॅन्स साठी काही आघाडीच्या मॉल्स मध्ये गेल्या दोन वर्षांपासून थांबलेली गोष्ट सुरू करण्यात येणार आहे. Cartoon Network ने अनेक शैलीतील अनेक ब्रॅन्ड्स बरोबर सहकार्य केले असून यामध्ये Indian Premier League (IPL) चा सामवेश आहे. ही भागीदारी देशातील पहिली लहान मुलांच्या ब्रॅन्डने केलेली भागीदारी आहे तसेच खाद्य आणि पेय, तंत्रज्ञान आणि थिएटर या क्षेत्रांचाही या भागीदारीत समावेश आहे.
कार्टून नेटवर्क च्या IPLची टिम असलेल्या Rajasthan Royals, बरोबरच्या भागीदारी मुळे एक मोठी परिणामकारक युती झाली आहे. यामध्ये Ekans आणि Tom and Jerry हे दोघेही खेळाडूंबरोबर डिजिटल मंचांवरून एकत्र असा कंटेंट निर्माण करतील. 99 Pancakes बरोबरच्या संपूर्ण भारतातील भागीदारी मुळे त्यांच्या १४ शहरांतील ३३ आऊटलेट्स मध्ये एप्रिल-मे महिन्याच्या कालावधीत Redraw Your World चे नवीन स्वाद हे लहान फॅन्स साठी असून त्या करता विशेष टूनटॅस्टिक मेन्यू तयार करण्यात आला आहे.
Reliance Digital बरोबरच्या कार्टून नेटवर्क च्या करारामुळे Redraw Your World या विषयावर आधारीत प्रेक्षकांसाठी स्टोअर डिस्प्ले आणि पात्रे एकत्र येऊन महाराष्ट्र आणि गुजरात मधील १०० स्टोअर्स मध्ये मनोरंजन करणार आहेत.
Redraw Your World ला साकारण्यासाठी Cartoon Network Fan Art कडून मुलांना त्यांची कलात्मकता दाखवण्याची संधी मिळणार असून त्यासाठी त्यांच्या कल्पनांनुसार चित्रे किंवा डूडल्स काढण्याची संधी मिळेल. त्याच बरोबर Cartoon Network India च्या Instagram ,YouTube आणि Facebook ला भेट देऊन #RedrawYourWorld ला भेट देऊन लहान मुलांसाठी टॅलेंट शोकेस स्पर्धा, चाईल्ड प्रॉडिजीज सह शॉर्ट व्हिडिओ सिरीज, AR फिल्टर्स अशा अनेक गोष्टी प्राप्त होतील.