Subscribe to our Newsletter
Loading
क्रीडा व मनोरंजन

औरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा


चिअर फॉर इंडिया ऑलिंपिकवीरांना शुभेच्छा देण्यासाठी औरंगाबाद जिल्हा ऑलिंपिक संघटनेची स्वाक्षरी मोहीम

औरंगाबाद, दि. 23 – टोकियोमध्ये ऑलिंपिक स्पर्धेला शुक्रवारी सुरुवात झाली, यात भारताचे 135 खेळाडू सहभागी झाले आहेत. या खेळाडूंना प्रोत्साहन आणि शुभेच्छा देण्यासाठी औंरंगाबाद जिल्हा ऑलिंपिक संघटनेच्या वतीने चिअर फॉर इंडिया या स्वाक्षरी मोहीमेची सुरवात शुक्रवारी(दि. 23) आमदार अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा उपसंचालक उर्मिला मोराळे उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थांनी औरंगाबाद जिल्हा ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे होते.
 विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजित कार्यक्रमात स्वाक्षरी मोहीमेची सुरवात करताना आमदार अतुल सावे म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भारताचा आलेख उंचावतो आहे. यंदाच्या स्पर्धांतही भारतीय खेळाडू चांगले यश मिळवून भारताचे नाव उंचावतील यात शंका नाही. त्यांच्या चांगल्या खेळासाठी आपण प्रोत्साहन देणे गरजेचे असून स्वाक्षरी मोहीमेत सर्वांनी सहभागी होत, खेळाडूंना शुभेच्छा द्याव्यात असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
औरंगाबाद ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाखळे म्हणाले की, आपले हे शुभेच्छा संदेश नक्कीच भारतीय खेळाडूंचे मनोबल वाढवतील. खेळाडू नक्कीच ऑलिंपिक स्पर्धेत चांगले यश मिळवतील अशी आशा व्यक्त करत त्यांनी या मोहिमेबाबत माहिती देत शहरवासियांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
तर क्रीडा उपसंचालक उर्मिला मोराळे म्हणाल्या की, ऑलिंपिक स्पर्धांच्या धर्तीवर क्रीडा संचालनालय वेगवेगळ्या प्रकारे खेळाडूंना प्रोत्साहन देत आहे. त्याचा फायदा खेळाडूंनी घेऊन आपले आणि आपल्या देशाचे नाव उज्वल करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी उपस्थित खेळाडू आणि प्रेक्षकांनी गो इंडिया गो आणि चक दे इंडिया अशा घोषणा देत, आपले शुभेच्छा संदेश दिले.
यावेळी औरंगाबाद ऑलिम्पिक संघटनेचे शिवछत्रपती पुरस्कार विजेते डॉ.मकरंद जोशी, डॉ.दिनेश वंजारे, डॉ.फुलचंद सलामपुरे, अब्दुल कादिर, सिद्धार्थ पाटील, प्रल्हाद निमगावकर, सागर मगरे, भिकन आंबे, महेश इंदापूरे, राहुल ताक, विश्वास जोशी, गोकुळ तांदळे, सागर बडवे, स्वप्नील तांगडे, राकेश खैरनार, विनोद माने, चरणजित संघा, निखिल कचेश्वर, अतुल जोशी, प्रबोधन बनसोडे, विकास सूर्यवंशी यांच्यासह मोट्या संख्येने खेळाडू शुभेच्छा संदेश देण्यासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृत बिराडे यांनी केले तर गोविंद शर्मा यांनी आभार मानले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close