Subscribe to our Newsletter
Loading
शेतीविषयक

सिल्लोड तालुक्यावर दुबार पेरणीचे संकट रिमझिम पावसाने पिके संकटात.!

विशाल जाधव/सिल्लोड

सिल्लोड तालुक्यावर दुबार पेरणीचे संकट घोंगावत असून तालुक्यात बहुतांश शेतकऱ्यांनी लागवड केली आहे यात प्रमुख्याने मका,सोयाबीन,कपाशी आदी पिकांचा समावेश आहे आता जर एक-दोन दिवसात पाऊस नाही झाला तर तालुका पुन्हा दुष्काळाच्या खाईत जाईल असे दिसत आहे .सुरुवातीला पेरणीयोग्य पाऊस झाल्याने सर्व शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करून पेरण्या आटोपल्या काही शेतकरी सोडले तर बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली आहे आता लवकरच जर मोठा पाऊस नाही झाला तर तालुक्यावर दुष्काळाचे चिन्ह गडद होताना दिसत आहे.

रिमझिम पावसाने कोरड्यातील पेरणीही वाया.?

सिल्लोड तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी धुळपेरणी केली होती.तसेच अनेकांनी सुरुवातीच्या बऱ्यापैकी दाखवलेल्या हवामान अंदाजवर सगळीच पेरणी करून आभाळाकडे डोळे लावले आहे.कोरड्यातील पेरणी रिमझिम पाऊस झाल्याने पेरलेले बियाणे जमिनीतच सडून जात आहे,त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे.

केंद्रीय व राज्यमंत्री काहीतरी करतील ही अपेक्षा.!

सिल्लोड तालुक्यास रावसाहेब दानवे यांच्या रूपाने एक केंद्रीय तसेच अब्दुल सत्तार यांच्या रूपाने एक राज्यमंत्री लाभले आहे.तशी मोठी राजकीय शक्ती तालुक्याच्या पाठिमागे आहे.यातून हे दोन्ही मंत्रीमहोदय योग्य समन्वय साधून बळीराजाच्या या कठीण काळात भक्कमपणे त्याच्या पाठीशी उभे राहून त्यास काय मदत मिळवून देतात ते पहावे लागेल.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close