Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

वडीगोद्री येथील लसीकरण मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद

वडीगोद्री/आर व्हि. छिल्लारे

अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सौंदलगाव,धाकलगाव,नालेवाडी,कोळी सिरसगाव व चंदनापुरी येथील उपकेंद्रात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम दि २३ जून रोजी आयोजित करण्यात आली होती.यावेळी सौंदलगाव येथे ९१,धाकलगाव येथे ९३,नालेवाडी ११९,कोळी शिरसगाव येथे १६८ व चंदनापुरी येथे ११९ असे एकूण ५९० नागरिकांनी लस घेतली.यावेळी १८ वर्षावरील नागरिकांनी लस घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.

कोरोनाचा प्रादुर्भाव हा जरी कमी झाला असला तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत देण्यात आले आहेत.त्यामुळे १८ वर्षावरील नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण करून घेणे आवश्यक आहे.लसीकरण हे कोरोनापासून बचाव होण्याचा एकमेव मार्ग आहे.त्यामुळे १८ वर्षापुढील नागरिकांनी लसीकरण केंद्रामध्ये जाऊन लसीकरण करावे,असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुशील जावळे यांनी केले आहे.

यावेळी नालेवाडीचे सरपंच धनंजय दुफाके,कोळीचे सिरसगावचे सरपंच दिलीप जाधवर,धाकलगावचे सरपंच बळीराम शेंडगे,दोदडगावचे सरपंच ज्ञानेश्वर वाघ,वैद्यकीय अधिकारी डॉ.सुशील जावळे,डॉ.मीरा सावंत,कानिफनाथ सावंत,आर.व्ही.छल्लारे,रामेश्वर राऊत,सुभाष बांगर,भीमसिंग राजपूत,हिरालाल राजपूत,अर्जुन राऊत आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी सुयोग उगले,स्वप्निल सानप,शिवानी भांगे,प्राजक्ता मोरे,टी.सी.अहिरे,एम.एल.ढाकणे,यु.ए.साने,ए.जे.शेख,एस.पी.कालापहाड,कैलास वराडे,टी.सी.अहिरे,वाय.बी.बळी,एन.एस.बिबे,विष्णू मिसाळ,ए.ए.शेख,बी.पी.काळे,लक्ष्मण जाधव,वंदना गवळी,अमोल दोरके,शिक्षक जाधव,चव्हाण,एस.आर.कोकणे,बी.आर.गाढे तसेच सर्व आशा,अंगणवाडी सेविका,ग्रामस्थ,आरोग्य पथक आदींनी लसीकरण शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close