Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

पैठण तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढले ,आडुळ शेतवस्तीवर कुटुंबाला घरात कोंडुन, लांबविला सव्वा लाखाला ऐवज

पैठण / किरण काळे

घराबाहेरुन कडी कोयंडा लावुन शेतकरी कुटुंबाला घरात कोंडुन अंदाजे सव्वा लाख रुपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची घटना आडुळ बु. (ता.पैठण) येथील शेतवस्तीवर घडली. विशेष म्हणजे चोरट्यांनी इतरही चार शेतकरयांच्या घरात याच पद्धतीने प्रवेश करुन चोरी करण्याचा प्रयत्न केल्याने शेती वस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आडुळ जवळील एका शेतवस्तीवरील बेरुबा मंदिर जवळ राहणाऱ्या शिवाजी नबाजी भावले यांच्या शेतात घर आहे ते येथेच कुटुंबासह राहतात.राञी नेहमीप्रमाणे झोपल्यानंतर चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री च्या सुमारास ते राहत असलेल्या घराच्या मुख्य लोखंडी गेटचा कुलुप तोडुन घरात प्रवेश केला व घरातुन कोणीही बाहेर येवु नये म्हणून बाहेरील दोन्ही दरवाजे व आतील दोन दरवाजे याची बाहेरुन कडी लावली व ज्या घरात सोनं व नगद पैसे होते त्यात प्रवेश करुन कपाटातील कपडे व इतर साहित्य अस्ताव्यस्त फेकुन कपाटात ठेवलेले नेकलेस ११ ग्राम, मनी २ ग्राम, बाळी २ ग्राम, नथ २ ग्राम व शेती मशागतीसाठी ठेवलेले नगद १५ पंधरा हजार रुपये असा अंदाजे सव्वा लाख रुपयांचा ऐवज लांबविला. तर जवळ राहणाऱ्या शेख रहिम यांचे १० हजार लांबविले आणि शेख अब्बास, ज्ञानेश्वर इंगळे,अनिल इंगळे या शेतकऱ्यांच्या
घरात याच पध्दतीने प्रवेश करण्याचा प्रयत्न करुन चोरी करण्याचा प्रयत्न केला.सदरील घटनेची नोंद पाचोड पोलिस घेण्यात आली आहे.सध्या पैठण तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाणात वाढ झाली असुन चोरांची दहशत निर्माण झाली आहे.ग्रामीण गुन्हे शाखा व पोलीसांनी चोरांना आवर घालुन त्यांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी ग्रामीण भागातुन जोर धरत आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close