Subscribe to our Newsletter
Loading
शेतीविषयक

पावसाचे पाणी शिरल्याने शेतीच्या झालेल्या नुकसानग्रस्त महसूल,समृद्धी अधिकाऱ्यांकडून पाहणी

करमाड प्रतिनिधी :– जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या कामामुळे पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात बदल झाल्याने 09 जून रोजी झालेल्या मुसळधार पावसाने भांबर्डा, जयपूर, गेवराई कुबेर या तीन गावातील शेतात पाणी शिरून पिकांचे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त भागाची पाहणीकरून तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी समृद्धी महामार्ग प्राधिकरणाला दिले. त्याअनुषंगाने भांबर्डा येथे समृद्धी महामार्गाच्या कामामुळे पावसाचे पाणी शिरल्याने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पहाणी मंगळवार दि.१५ जुन रोजी जिल्हा परिषद अध्यक्षा पती रामराव शेळके, महसूल विभागाचे तहसीलदार ज्योती पवार, समृद्धी महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता सुरेश अभंग, मेघा व्यवस्थापक अधिकारी सत्यनारायण, मेघा कंपनीचे इंजिनियर राजु सर,हायवे इंजिनियर कार्तिक यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. समृद्धी महामार्गाच्या कामामुळे मुसळधार पावसाच्या पाण्यामुळे झालेल्या भांबर्डा गावांतील शेतात पाणी शिरले. पाण्याचा निचरा होण्याची योग्य व्यवस्था नसल्याने डोंगर माथ्यावरील पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात भांबर्डा, जयपूर गावातील शेतात शिरून शेतकऱ्यांच्या पीकांचे नुकसान झाले. यापुढील अशा घटना रोखण्यासाठी समृद्धी महामार्ग प्राधिकरणाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून त्यांच्या अधिकाऱ्यांना तातडीने उपाय योजना कराव्यात अशा सूचना समृद्धी महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता सुरेश अभंग, मेघा व्यवस्थापक अधिकारी सत्यनारायण यांनी संबधित अभियंताना केल्या तातडीने यंत्रणा उभी करून पावसाच्या पाण्याचे प्रवाह लक्षात घेऊन त्यापद्धतीने नाल्या तयार करून पाण्याची व्यवस्था करावी असेही ते म्हणाले. तसेच यावेळी गावकऱ्यांनी सव्हिस रस्ता(शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याचे निवेदन समृद्धी महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता सुरेश अभंग यांना दिले होते. त्यात म्हटलं होतं की पूर्वी आलेले पाधी रस्ते समृद्धी महामार्गाच्या कामामुळे बंद करून त्याजागी महामार्ग तयार झाला आहे मात्र शेतकऱ्यांची जमीन दोन्ही बाजूला असल्याने त्याना शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने मोठा संकट शेतकऱ्यांपुढे उभे राहिले होते पण श्री.अभंग यांनी शेतकऱ्यांना समृद्धी महामार्गा हद्दीतील जागेवर 8 फूट रस्ता शेतकऱ्यांना जाण्यासाठी दोन किलोमीटर अंतरापर्यंत केला जाईल असे आश्वासन शेतकऱ्यांना त्यांनी दिले. यावेळी सरपंच भीमराव पठाडे, बळीराम काळे, सुखदेव पठाडे, दौलत पठाडे,भीमराव साळुंके, अंबादास पठाडे, सोमिनाथ जाधव, भाऊसाहेब पठाडे, संतोष दिवटे, भिका नजन, सुनील काळे यांच्यासह शेतकरी उपस्थिती होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close