Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

खोपोली येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज कोविड हेल्थ सेंटरचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

खोपोली येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज कोविड हेल्थ सेंटरचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न
अलिबाग,जि.रायगड, दि.15 (जिमाका):- खालापूर तालुक्यातील खोपोली के.एम.सी कॉलेज येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज कोविड हेल्थ सेंटरचे पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या शुभहस्ते आणि खासदार श्रीरंग बारणे,आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल (दि.14 जून रोजी) उद्घाटन संपन्न झाले.
यावेळी अलिबाग नगरपरिषदेच्या नगरसेविका श्रीमती चित्रलेखा पाटील, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य नवीन घटवाल, खोपोलीच्या नगराध्यक्षा सुमनताई औसरमल, उपनगराध्यक्षा विनिता औटी- कांबळे, पंचायत समितीच्या सभापती सौ.अर्चना पाटील, खोपोलीचे माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर, माजी नगराध्यक्ष सुनील पाटील, श्री.अंकीत साखरे, उपविभागीय अधिकारी वैशाली ठाकूर-परदेशी, तहसिलदार ईरेश चप्पलवार, नगरपालिका मुख्याधिकारी गणेश शेटे, नगरपालिका दवाखाना वैद्यकीय अधिकारी डॉ.संगिता ठाकूर-वानखेडे, नगरसेवक अमोल जाधव, काशिनाथ गायकवाड, माधुरी रिठे, जिनी सॅम्युअल, केविना गायकवाड, लिलाबाई धुमणे, निकिता पवार, निर्मला शेलार, विकास खुरपुडे, श्री.चूरी, श्री.गुप्ता, एकनाथ पिंगळे, ॲड. येरुणकर, नरेंद्र गायकवाड, गगणगिरी ट्रस्टचे श्री.माने, श्री.शिवाजी पाटणकर, कोविड हॉस्पिटलचे डॉ.विकास कांबळे आणि त्यांचे सर्व सहकारी, खालापूर ता. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री.संतोष जंगम, कार्यवाह श्री.किशोर पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी, खोपोली कारखानदार संघाचे पदाधिकारी तसेच सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
या कोविड सेंटरमध्ये 50 बेडस् ची क्षमता असून 15 बेडस् ऑक्सिजन व 36 बेडस् हे जनरल वॉर्डसाठी असणार आहेत. खालापूर येथील ग्रामीण रुग्णालय मंजूरीसाठी अंतिम टप्प्यात असून तालुक्यातील आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्यासाठी बोरगाव, सावरोली येथे प्राथमिक आरोग्य केंद्र तर आसरे व वासांबे येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची उभारणी करण्यात येत असून त्यासाठी जागेचे हस्तांतरण देखील झाले आहे.
महाराष्ट्रातील एकमेव असे हे कोविड रूग्णालय असून ते पूर्णतः आधुनिक असून सर्व उपचार मोफत पुरविणार असल्याने सर्व मान्यवरांनी याबाबत विशेष गौरवोद्गार काढले. हे कोविड रुग्णालय कार्यान्वित करण्यासाठी सर्व क्षेत्रातून मदत करण्यात आली आहे. तसेच आमदार महेंद्र थोरवे व चित्राताई पाटील यांच्यासह विविध मान्यवरांनी मोठे आर्थिक सहकार्य केले असून वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा खर्च कारखानदार संघ तर ऑक्सिजनचा खर्च श्री.सुनील गुप्ता हे करणार आहेत. येथील केमिस्ट असोसिएशननेही या कार्याकरिता उत्तम सहकार्य केले आहे. या सर्व दात्यांचे त्यांच्या दानशूरपणाबद्दल सर्व मान्यवरांनी आभार मानले. शेवटी नगरसेवक मोहन औसरमल यांनी आभार प्रदर्शन केले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close