Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

तळा तालुक्यातील कुडा बौध्द लेणी पर्यटन विकास आराखडा तयार करण्यास शासनाची मान्यता

आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणाबरोबरच पर्यटन विकासाचाही पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचा ध्यास

अलिबाग,जि.रायगड,:– तळा तालुक्यातील कुडा बौध्द लेणी या पर्यटनस्थळाचा विकास होऊन या ठिकाणी अधिकाधिक संख्येने पर्यटक यावेत, यासाठी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी व्यक्तिश: लक्ष घालून प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून कुडा बौध्द लेणी पर्यटन विकास आराखडा तयार करण्यास अखेर शासनाची मान्यता मिळाली आहे.
कोकणातील ग्रामीण भागातील भूमीपुत्रांना त्यांच्याच गावात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, कोकणात विकास कामांची गती वाढविण्यासाठी, ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना देवून, पर्यटन विकासातून गावांमध्ये पर्यटनासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे व पर्यायाने गावाचा विकास करणे,या उद्देशाने पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी कुडा बौध्द लेणी संवर्धनासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, सहव्यवस्थापकीय संचालक धनंजय सावळकर यांच्यासह कुडा बौध्द लेणी येथे प्रत्यक्ष पाहणी करून पर्यटनवृद्धीच्या दृष्टीने काय करता येईल, याबाबत चर्चा केली होती.
चर्चेतील विविध बाबींचा सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यानंतर राज्य शासनामार्फत विकसित करण्यात येणाऱ्या पर्यटनस्थळांचा खऱ्या अर्थाने विकास होण्यासाठी, पर्यटनास चालना देण्यासाठी रायगड जिल्ह्यातील तळा तालुक्यातील कुडा बौध्द लेणी पर्यटन विकास आराखडा तयार करण्यास पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या प्रयत्नातून अखेर शासनाची मान्यता मिळाली आहे.
या प्राचीन बौध्द लेणींचा पर्यटनांत समावेश करून येथील विकास करण्यात येणार आहे. या लेण्यांचा विकास झाल्यास स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होणार आहे.
रायगड जिल्ह्यामधील ऐतिहासिक पर्यटनस्थळांपैकी तळा तालुक्यातील कुडे प्राचीन बौध्द लेणीचा उल्लेख केला जातो. जगाच्या इतिहासामध्ये कुडे प्राचीन बौद्ध लेण्यांची नोंद आपणास पहावयास मिळते. सम्राट अशोक यांनी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी लेण्यांची निर्मिती केली. येथे 26 कोरीव लेण्यांचा समूह कोरलेला आहे. या लेण्यांची नोंद इ.स.1848 मध्ये सापडली असून या लेण्या इ.स. पूर्व सहाव्या शतकात स्थापन करण्यात आलेल्या आहेत. लेणीतील 26 गुहांपैकी 4 चैत्यगृहे या ठिकाणी आढळतात. भिक्षूंना राहण्यासाठी त्या काळात व्यवस्था केली जात असल्याचे दिसून येते. भगवान गौतम बुध्दांच्या कोरीव प्रतिमादेखील यामध्ये आहेत. गेली अनेक वर्षे नागरिकांकडून लेणीचा विकास करण्यासंदर्भात मागणी करण्यात आली होती. त्याची दखल घेत पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी हा पाहणी दौरा केला होता.
यावेळी लेणीचा विकास आणि संवर्धन पुरातत्व विभागाच्या नियमांच्या अधीन राहून अधिक चांगल्या पध्दतीने कसे करता येईल, या विषयी सविस्तर चर्चा करण्यात आली होती. या चर्चेत तळा पंचायत समिती सभापती देविका लासे, रा.जि. प. च्या महिला व बालकल्याण सभापती गीता जाधव, रा. जि.प. सदस्य बबन चाचले, नगरसेवक चंद्रकांत रोडे, उपसभापती गणेश वाघमारे, मोदाड ग्रा.पं. सरपंच तानाजी कालप माणगाव प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर, तहसिलदार अण्णामा कनशेट्टी, गटविकास अधिकारी श्री. यादव, पोलीस निरीक्षक श्री. गैंगजे आदि मान्यवरांनी आपला सहभाग नोंदविला होता.
पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणाचा ध्यास तर घेतला आहेच त्याचप्रमाणे त्यांनी जिल्ह्यातील पर्यटन विकासाचाही ध्‍यास घेतला आहे. या दृष्टीने पर्यटनास वाव असणाऱ्या जिल्ह्यातील विविध प्रेक्षणीय स्थळांचा विकास करण्याच्या दृष्टीने त्या सर्वतोपरी प्रयत्नशील आहेत. याकरिता त्या सतत शासनाकडे पाठपुरावा करीत आहेत.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close