ओ अंतावा’ आता मराठीतून
गायिका रागिणी कवठेकरचा ‘ओ अंतावा’
सुपरहिट ‘पुष्पा’ सिनेमातील ‘ओ अंतावा’ हे कमाल गाजलेले गाणे आता मराठीत सादर झालं आहेय. गायिका रागिणी कवठेकर यांनी सादर केलेल्या या गाण्याच्या मराठी व्हर्जनला मुळ गाण्याइतकीच प्रसिद्धी मिळत आहे.
यापूर्वी विविध भाषांमध्ये सादर झालेल्या ओ अंतावा गाण्यांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. विविध पार्ट्या आणि वरातीमध्ये अक्षरशः वेड लावणा-या या गाण्याचे मराठी व्हर्जन देखील तीच जादू कायम ठेवणार असल्याचा विश्वास या गाण्याच्या संपूर्ण टीमला आहे. सशांक कोंडविलकर यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याचे संकलन सुधांशू झा, आणि साँग मिक्सिंग डॉनी हजारिका यांनी केलं आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या ‘ओ अंतावा’ च्या मराठी व्हर्जनचा आस्वाद जर तुम्ही घेतला नसेल तर एकदा नक्की घ्या!