सेकंड लाइफ जग्वार आय-पेस बॅट-यांची शक्ती असलेले झीरो-एमिशन एनर्जी स्टोरेज युनिट
गेडन, युके: जग्वारच्या अभियांत्रिकी टीमने प्रमॅकसोबत काम करत प्रोटोटाइप व इंजीनिअरिंग टेस्ट वेईकल्समधून घेतलेल्या सेकंड-लाइफ जग्वार आय-पेस बॅट-यांची शक्ती असलेले झीरो-एमिशन एनर्जी स्टोरेज युनिट विकसित केले आहे.
दीड सेकंड-लाइफ जग्वार आय-पेस बॅट-यांमधील लिथियम-आयन सेल्स असलेले प्रमॅकचे तंत्रज्ञान ऑफ ग्रिड बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टिम (ईएसएस) झीरो-एमिशन शक्तीचा पुरवठा करते, जेथे मुख्य पुरवठ्याची उपलब्धता मर्यादित असते किंवा पुरवठा उपलब्ध नसतो. आपली क्षमता दाखवण्यासाठी युनिटने युके व स्पेनमधील चाचणीदरम्यान जग्वार टीसीएस रेसिंगला २०२२ एबीबी एफआयए फॉर्म्युला ई वर्ल्ड चॅम्पियनशीपसाठी तयारी करण्यामध्ये मदत केली, जेथे रेस कार्सच्या ट्रॅक परफॉर्मन्सचे विश्लेषण करणा-या टीमच्या अत्याधुनिक नैदानिक उपकरणाचे कार्यसंचालन पाहण्यासाठी आणि जग्वार पिट गॅरेजला सहाय्यक शक्तीचा पुरवठा करण्यासाठी या युनिटचा वापर करण्यात आला.
जग्वार टीसीएस रेसिंगद्वारे ऑफ ग्रिड बॅटरी ईएसएसची चाचणी व प्रमाणीकरण रेस-टू-रोड-टू-रेस चक्रीय तंत्रज्ञान ट्रान्सफरला दाखवते. जग्वार टीसीएस रेसिंगमधील निष्पत्तींमधून यापूर्वी आय-पेस ग्राहकांना सॉफ्टवेअर-ओव्हर-दि-एअर (एसओटीए) अपडेटची माहिती मिळाली आहे, ज्याने रिअल-वर्ल्ड रेंज जवळपास २० किमीपर्यंत वाढवली आणि आता रेसिंग टीमच्या प्रोग्रामसंदर्भात ऑफ ग्रिड बॅटरी ईएसएससाठी युज केसेसचे विश्लेषण केले जात आहे. ९ व १० एप्रिल रोजी फॉर्म्युला ई वर्ल्ड चॅम्पियनशीपच्या चौथ्या व पाचव्या फेरींना हिरवा सिग्नल दाखवण्यात येणार आहे.
प्रमुख ईएसएस सिस्टिममध्ये जवळपास १२५ केडब्ल्यूएचची क्षमता आहे, जी जग्वारची बहुपुरस्कार-प्राप्त ऑल-इलेक्ट्रिक आय-पेस परफॉर्मन्स एसयूव्ही पूर्णत: चार्ज करण्यासाठी किंवा आठवड्याभरातील नियमित वापराला शक्ती देण्यासाठी पुरेशी आहे*. सोलार पॅनेल्सवर चार्ज करण्यात येणारे हे युनिट स्वयं-चलित सोल्यूशन आहे, ज्यामध्ये द्विमार्गीय कन्वर्टरशी जोडलेली बॅटरी सिस्टिम आणि सहाय्यक कंट्रोल मॅनेजेमेंट सिस्टिम्सचा समावेश आहे. व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध युनिट्समध्ये टाइप २ इलेक्ट्रिक वेईकल (ईव्ही) चार्ज कनेक्शन्ससह डायनॅमिक कंट्रोल आहे आणि इलेक्ट्रिक वेईकल चार्जिंगसाठी जवळपास २२ केडब्ल्यू एसी प्रमाणित आहे.
वाहनांमधून काढल्यानंतर बॅट-यांना सेकंड लाइफ दिल्याने अकाली पुनर्वापर टाळता येऊ शकतो आणि दुर्मिळ साहित्याचा सुरक्षित पुरवठा निर्माण करण्यामध्ये मदत होऊ शकते. जग्वार आय-पेसमधील अत्याधुनिक ९० केडब्ल्यूएच लिथियम-आयन बॅटरी जवळपास २९४ केडब्ल्यू शक्ती आणि ६९६ एनएम इन्स्टण्ट टॉर्क देते, ज्यामुळे ही वेईकल फक्त ४.८ सेकंदांमध्ये ०-१०० किमी/तास गती प्राप्त करते. बॅटरी तिची उल्लेखनीय कामगिरी व कार्यक्षमतेशी जुळण्यासोबत टिकाऊपणासाठी विकसित करण्यात आली आणि आय-पेस ग्राहकांना ८ वर्षांच्या किंवा १६०,००० किमी अंतरापर्यंतच्या बॅटरी वॉरंटीचा लाभ मिळतो, ज्यादरम्यान किमान ७० टक्के स्टेट ऑफ हेल्थ राखला जातो.
हे प्रगत इंजीनिअरिंग आय-पेस बॅटरीला सेकंड-लाइफ आणि थर्ड-लाइफसाठी, तसेच बॅटरी हेल्थ इलेक्ट्रिक वेईकलच्या प्रखर आवश्यकतांच्या खाली आल्यानंतर लो-एनर्जी स्थितींमधील उपयोजनांसाठी देखील परिपूर्ण बनवते. बॅटरी अखेर तिच्या वापराच्या शेवटच्या टप्प्यावर आल्यानंतर ९५ टक्के पुनर्चक्रणीय आहे.
प्रमॅक सारख्या उद्योग अग्रणीसोबत सहयोग करण्यासह जग्वार टीसीएस रेसिंग फॉर्म्युला ई च्या जनरेशन ३ युगाच्या दीर्घकालीन भविष्याप्रती कटिबद्ध आहे. टीम जग्वार लॅण्ड रोव्हरला नवीन स्थिर तंत्रज्ञान विकसित करण्यामध्ये, त्यांच्या सहयोगींसह दर्जासंदर्भात नवीन बेंचमार्क्स स्थापित करण्यामध्ये मदत करेल आणि २०२५ पासून ऑल-इलेक्ट्रिक लक्झरी ब्रॅण्ड म्हणून जग्वारच्या नवनिर्मितीला पाठिंबा देईल.
जग्वार लॅण्ड रोव्हरयेथील सर्क्युलर इकोनॉमी टीमचे बॅटरी मॅनेजर अँड्र्यू व्हाइटवर्थ म्हणाले, ”ही घोषणा आम्ही स्थिर भविष्य देण्यासाठी आणि अस्सल चक्रीय अर्थव्यवस्था संपादित करण्यासाठी उद्योग अग्रणीसोबत करणा-या सहयोगाचे उत्तम उदाहरण आहे. जग्वार आय-पेस सेकंड-लाइफ बॅट-यांचा वापर करत पोर्टेबल झीरो-एमिशन्स शक्ती देण्यासाठी प्रमॅकसोबत सहयोगाने काम करण्याचा आम्हाला आनंद होत आहे. यंदाच्या सीझनमध्ये जग्वार टीसीएस रेसिंगला पाठिंबा देणे ही या युनिट्सची क्षमता दाखवण्यासाठी सर्वोत्तम संधी होती.”
जग्वार टीसीएस रेसिंगचे टीम प्रिन्सिपल जेम्स बर्क्ले म्हणाले, ”फॉर्म्युला ई स्थापनेपासून जगातील पहिला नेट कार्बन झीरो स्पोर्ट आहे. जग्वार टीसीएस रेसिंग नेहमीच आमचे कार्बन उत्सर्जन सुधारण्याचा प्रयत्न करते आणि स्टोरेज सिस्टिमचा वापर आम्हाला चाचणीसाठी नवोन्मेष्कारी नवीकरणीय ऊर्जा सोल्यूशन देतो. सेकंड-लाइफ जग्वार आय-पेस बॅट-यांचा वापर या स्थिर चक्राला पूर्ण करतो आणि टीमच्या मिशनला नवोन्मेष्कारी रूप देण्याप्रती रेसला दाखवतो.”
प्रमॅकचे संचालक डॅनी जोन्स म्हणाले, ”जग्वार लॅण्ड रोव्हरसोबत सहयोगाने काम करणे हे आमचे भाग्यच आहे. ते सेकंड-लाइफ ईव्ही मॉड्यूल्सचा वापर करत प्रबळ उत्पादन व व्यावसायिकदृष्ट्या अपरिहार्य व्यवसाय यशस्वीरित्या निर्माण करण्याच्या आमच्या प्रवासामध्ये सहाय्यक भागीदार आहेत. यामुळे ऊर्जा कार्यक्षम व कार्बनचे प्रमाण कमी करणा-या तंत्रज्ञानाचे उत्पादक म्हणून स्थिरता गाथेमध्ये नवीन घटकाची भर होते. आम्ही जग्वार लॅण्ड रोव्हरसोबतचा हा प्रवास सुरू ठेवण्यास आणि त्यांच्या दर्जात्मक वाहनांच्या विद्युतीकरणाला पाठिंबा देण्यासाठी नवोन्मेष्कारी चार्जिंग पायाभूत सुविधा सोल्यूशन्स देण्यास उत्सुक आहोत.