श्री सिद्धेश्वर महाराजांची १०६ वी पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी साजरी

ताज्या घडामोडी साठी सक्राईब करा..,प्रतिक्रिया कळवा
सिल्लोड/विशाल जाधव
-मराठवाड्यातील आराध्य दैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या १०६व्या पुण्यतिथी (वैकुंठ चतुर्दर्शी)समाधी दिनानिमित्त श्री क्षेत्र धोत्रा येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. दि २२नोव्हेंबर पासून श्री श्रीराम कथा,कल,अखंड वीणा वादन, श्री ग्रंथ पारायण,यासह विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते
mh20live Tv
यंदा गावकरी,संस्थान यांनी हे सर्व कार्यक्रम कोरोना प्रादुर्भवामुळे थोडक्यात साजरे केले.कुठेही गर्दी न होता डॉ.प्रवीणसिंह जाधव यांनी श्रीराम कथेचे वाचन केले.कथेस शासकीय दिशानिर्देश पाळण्यात आले.कथेस अमोल जाधव(गायनाचार्य),अजय जाधव(तबलावादक),संतोष जाधव(गायनाचार्य) आदींनी साथ दिली. श्री सिद्धेश्वर लीला अमृत कथेचे पारायण आर.डी. जाधव यांनी केले. सात दिवस चाललेल्या या सर्व कार्यक्रमांचा लाभ श्री सिद्धेश्वर भक्तगण यांनी शासनाचे कोरोना विषयी चे सर्व दिशानिर्देश पाळून घेतला.दिनांक २९/११/२०२० वार रविवार ,वैकुंठ चतुर्दर्शी दिनी सकाळी सर्व संत महंत यांच्या हस्ते समाधी स्थळी श्री अभिषेक व पूजन झाले.ह.भ.प विष्णू महाराज सास्ते ,पिंपळगाव यांच्या काल्याच्या किर्तनाने वातावरण भक्तिमय झाले होते.ह.भ.प विष्णू महाराज सास्ते यांनीआपल्या कीर्तनातून श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या पावन जीवनचरित्रावर थोडक्यात प्रकाश टाकला.याप्रसंगी भाविक मंत्रमुग्ध होऊन भक्तिमय वातावरणात तल्लीन झाले होते.काल्याच्या किर्तनांनंतर श्रींची पालखी मिरवणूक झाली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात आला.
श्री सिद्धेश्वर महाराज पुण्यतिथी उत्सवाचे हे सलग १०६ वे वर्ष असल्याने गावकरी व समितीने या ठिकाणी चोख बंदोबस्त केला होता.भाविकांच्या ऑनलाईन दर्शनाची सोय फेसबुक द्वारे करण्यात आली होती.
व्यसनमुक्त जीवन जगा-ए. पी.आय गिरीधर ठाकूर
याप्रसंगी अजिंठा पोलीस स्टेशनचे प्रमुख गिरीधर ठाकूर यांनी भक्ताना मार्गदर्शन केले. व्यसनमुक्त जीवन जगा व आई वडिलांची सेवा करा असे ते म्हणाले.किर्तनसेवेत मर्दुन्ग वाजवून त्यांनी भाविकांचे मन जिंकले.