एमजीएम संस्कार विद्यालयाच्या खेळाडूंची राष्ट्रीय तलवारबाजी जम्परोप स्पर्धेमध्ये सुवर्ण कामगिरी
औरंगाबाद: नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय तलवारबाजी व जपरोप स्पर्धेमध्ये एमजीएम संस्कार विद्यालयाच्या खेळाडूंनी सुवर्ण कामगिरी करून 5 पदक संपादन केली.
स्पर्धेविषयी सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे
रायपूर (छत्तीसगढ)येथे पार पडलेल्या 23व्या सब जूनियर राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्य कडून प्रतिनिधित्व करत यशश्री वंजारे ने रोप्य पदक( दुतीय) तर नरेश वंजारे यांनी कास्यपदक( तृतीय) संपादन केला. तर आग्रा येथे पार पडलेल्या 8 वी ज्युनियर राष्ट्रीय जंपरोप स्पर्धेमध्ये १८ वर्षांखालील – 1) हर्ष टाकवले – (30 से. वेग वैयक्तिक) सुवर्णा (प्रथम) २) चैतन्य हरणे (३ मिनिटे सहनशक्ती वैयक्तिक) कांस्य ( तृतीय) १) हर्ष ताकवले २) चैतन्य हरणे (सिंगल रोप स्पीड रिले) रोप्य (द्वितीय) पदक संपादन केले.
या यशाबद्दल एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशरावजी कदम, शाळेच्या संचालिका डॉ. अपर्णा कक्कड, प्रशासक सुषमा मोहिते , मल्लिका नायर ,शाळेच्या प्राचार्य उषा जाधव स्मिता मुख्याध्यापिका स्मिता कुलकर्णी , पर्यावेक्षक विशाल भुसारे,क्रीडाशिक्षक शरद पवार, विवेक पाटील
आदींनी अभिनंदन केले.