Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

चारा छावणीच्या आठवणींनी सर्वांना गहिवरले

चारा छावणीच्या आठवणींनी सर्वांना गहिवरले

–         दगावलेल्या जनावरांच्या पालकांना विम्याच्या धनादेशाचे वितरण

–         भारतीय जैन संघटना आणि बजाज ऑटोचा उपक्रम

औरंगाबादः बजाज ऑटो लि. आणि भारतीय जैन संघटनेतर्फे गीताबन मार्केट (लासूर स्टेशन, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) येथे ३० एकर परिसरात वर्ष २०२९ मध्ये चारा छावणी उभारण्यात आली होती. ही चारा छावणी भारतातील सर्वोत्कृष्ट मॉडेल म्हणून गणली गेली. चारा छावणीत असलेल्या सहा हजार २०० पैकी केवळ दहा जनावरे आजारांमुळे दगावली. या दहा जनावरांच्या पालकांच्या हाती विम्याचा धनादेश देतांना मानसिक समाधान मिळत आहे, अशी भावना बजाज फाऊंडेशनचे सी.पी. त्रिपाठी यांनी व्यक्त केली. ते गुरुगणेश नगर येथील डीकेएमएममध्ये आयोजित कार्यक्रमात मंगळवारी (ता. १०) बोलत होते.

यावेळी प्रकल्प प्रमुख गौतम संचेती, जिल्हाध्यक्ष किशोरललवाणी, ॲड. दिलीप खिवंसरा, डॉ. प्रकाश झांबड, कोषाध्यक्ष प्रविण छाजेड, निर्मलकुमार कोठारी, दिलीप मुगदीया, रुपचंद पारख, गौतम भंडारी आणि प्रकाश कोचेटा यांची उपस्थिती होती. श्री. त्रिपाठी म्हणाले, की भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्यांनी तन, मन आणि धनाने या सर्व जनावरांची सेवा केली. यादरम्यानच्या असंख्य आठवणी आज जाग्या होत आहेत. सर्व स्वयंसेवक, जनावरे आणि त्यांच्या पालकांमध्ये एकप्रकारचे भावनिक नाते निर्माण झाले होते. याकाळात केवळ दहा जनावरे मृत्यूमुखी पडली होती. हे एकत्रित यश सर्वांचे आहे. भारतीय जैन संघटनेचे काम पाहता यापुढेही सामाजिक कार्यात बजाज फाऊंडेशन आपल्या सोबत असेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

प्रकल्पप्रमुख गौतम संचेती म्हणाले की, सामाजिक कार्यात भारतीय जैन संघटना सदैव अग्रेसर आहे. कोरोनामध्येही मिशन झिरो अंतर्गत महापालिकेसोबत मिळून काम करत आहे. आता कोरोनाचा वेग कमी होऊन शून्याकडे जातोय. ही सर्वांसाठी आनंदाची बाब  आहे. येत्या काळातही कोणत्याही आपात्कालीन स्थितीत सदैव पुढाकार घेईल.

प्रस्तावनेत जिल्हाध्यक्ष किशोर ललवाणी म्हणाले, की चारा छावणीच्या निमित्ताने एक वेगळे जग अनुभवता आले. चारा छावणीत केलेल्या कामाचे मानसिक समाधान शब्दांत व्यक्त करता येण्यासारखे नाही. आमच्या हाकेला बजाज ऑटोने सकारात्मक साद दिल्यामुळेच इतका मोठा प्रकल्प पूर्ण करता आला. त्याचबरोबर बीजेएसचे संस्थापक शांतीलाल मुथा, गौतम संचेती आणि बजाज फाऊंडेशनचे सी.पी. त्रिपाठी यांच्याकडून समाजसेवेकरिता प्रेरणा मिळत असते.

या शेतकऱ्यांना विम्याच्या धनादेशाचे वाटप

शेषराव पवार, संतोष तांबे, दत्तात्रय पवार, शिवाजी तायडे, रामप्रसाद वाघ, भाऊसाहेब बोरकर, संजय गायकवाड, आप्पासाहेब नवले, भीका शेजुळ आणि मधुकर पुंडे या दहा शेतकऱ्यांना विम्यापोटी किमान १८ ते २५ हजार रुपयांपर्यंतचे धनादेश मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी बजाज ऑटो लि. आणि भारतीय जैन संघटनेचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रकाश कोचेटा यांनी मानले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close