Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

मंगल कार्यालय चालकांनी 50 पाहुण्यांची मर्यादा पाळावी, अन्यथा कारवाई: मनपा

औरंगाबाद /mh20live Network

मंगल कार्यालय चालकांनी 50 पाहुण्यांची मर्यादा पाळावी, अन्यथा कारवाई: मनपा
मनपा, (ज.स.अ) शहरातील कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मंगल कार्यालय चालकांनी लग्न सोहळ्याला मंगल कार्यालय देताना 50 व्यक्तींपेक्षा जास्त गर्दी होऊ नये याची दक्षता घ्यावी, अशी सूचना आज औरंगाबाद महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त श्री आस्तिक कुमार पांडेय यांच्या तर्फे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ नीता पाडळकर यांनी आज एका बैठकीत केली.
शहरातील सर्व मंगल कार्यालय चालकांची बैठक आज दि 24 नोव्हेंबर रोजी मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्र येथे आयोजित करण्यात आली होती.
सदरील बैठक मा प्रशासक यांच्या वतीने डॉ पाडळकर यांनी घेतली.
या बैठकीत मा प्रशासकांच्या वतीने खालील प्रमाणे सूचना करण्यात आल्या.
1) मंगल कार्यालय लग्न सोहळा व इतर कार्यक्रमांसाठी देताना शासन निर्देशानुसार फक्त 50 व्यक्ती त्या कार्यक्रमात उपस्थित राहण्याची मुभा द्यावी.
2) जर मंगल कार्यालयात एका कार्यक्रमात 50 पेक्षा जास्त व्यक्ती आढळून आले तर संबंधित मंगल कार्यालय पुढच्या एक महिन्यासाठी सील करण्यात येईल. दुसऱ्यांदा नियमांची पायमल्ली होत निदर्शनास आले तर पुन्हा एक महिन्यासाठी मंगल कार्यालय बंद करण्यात येईल. तिसऱ्यांदा दोषी आढळल्यास संबंधित मंगल कार्यालय चालकांविरुद्ध कारवाई करण्यात येईल.
3) मंगल कार्यालय देण्या पूर्वी हॉल व परिसराचे निर्जंतुनीकरण करावे आणि कार्यक्रमाबाबत संबंधित पोलीस स्टेशन आणि वॉर्ड अधिकारी यांना सूचित करणे अनिवार्य राहील.
4)सोहळ्यात सहभागी होणारे संबंधित व्यक्तींनी मास्क, सॅनिटाईझर आणि सोशल डिस्टनसिंगचा काटेकोरपणे पालन करावे याची दक्षता मंगल कार्यालय चालकांनी घ्यावी.
5) जेवणासाठी टेबल खुर्ची देखील सोशल डिस्टनसिंगचा नियम पाळून लावावी.
6) सोहळ्यासाठी हॉल देताना हॉलचे दरवाजे आणि खिडक्या उघडी ठेवावी. तसेच शासनानी दिलेली नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे.
यावेळी मंगल कार्यालय चालकांची सूचना एकूण घेण्यात आली. तुम्ही केलेल्या सूचना मा प्रशासक यांच्या समोर तंतोतंत सादर केले जाईल आणि त्यावर मा प्रशासकांचा निर्णयाबाबत आपणास अवगत करण्यात येईल, असे डॉ पाडळकर म्हणाल्या.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close