Subscribe to our Newsletter
Loading
करिअर

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व डिझेल इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षण कार्यक्रम

अलिबाग,जि.रायगड : मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या सहा महिने मुदतीचेसागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व डिझेल इंजिन देखभाल व परिचालन या प्रशिक्षणाच्या दि.01-जुलै 2020 पासून मत्स्यव्यवसाय,प्रशिक्षण केंद्र रायगड-अलिबाग येथे सुरु होणा-या प्रशिक्षण सत्रासाठी रायगड जिल्ह्यातील युवकांकडून दि. 29 जून 2020 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. प्रशिक्षणा अंतर्गत प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण केंद्राच्या 57 फूट लांबी असलेल्या, 63.35 टनेज क्षमंतेच्या सिलेंडर संख्या 6 व 205 अश्वशक्तीचे इंजीन असलेल्या “मत्स्यप्रबोधिनी” नोंदणी क्र. IND-MH-3-MM-4266 या प्रशिक्षण नौकेद्वारे सागरी सफरीवर नेऊन प्रात्यक्षिक व सिध्दांतिक ज्ञान दिले जाते. त्याबाबतचा तपशिल पुढीलप्रमाणे –

प्रशिक्षण कालावधी :- दि.01 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2020 (6 महिने)

आवश्यक पात्रता :-उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्ष असावे. (आधारकार्ड व रेशनकार्ड छायाप्रत जोडणे), उमेदवार किमान चौथी पास असणे आवश्यक (शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायाप्रत जोडणे, क्रियाशिल मच्छिमार व किमान एक वर्ष मासेमारीचा अनुभव असावा. (विहित नमुन्यातील अर्जावर मच्छिमार सहकारी संस्थेची शिफारस घ्यावी), उमेदवारास पोहता येणे आवश्यक आहे.

प्रशिक्षण शुल्क :- प्रतिमाह रु.450/- प्रमाणे सहा महिन्यांचे रु.2700/- मात्र. दारिद्रय रेषेखालील असल्यास प्रतिमाह रु.100/- प्रमाणे सहा महिन्यांचे रु.600/- मात्र. (दारिद्रय रेषेखालील उत्पन्नाचा गटविकास अधिकारी यांचा दाखला जोडावा.)

रोजगार स्वयंरोजगाराच्या संधी : राष्ट्रीय सहकार विकास (NCDC) अंतर्गत योजनेतून अर्थसहाय्य घेवून मच्छिमारी नौका बांधता येते. कस्टम विभाग, नेव्हल डॉक, महाराष्ट्र मेरी टाईम बोर्ड, सागरी पोलीस, मत्स्य महाविद्यालय इ.विभागाच्या सागरी नौकांवर पात्रतेनुसार खलाशी म्हणून रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते.

संपर्क :- रत्नाकर प्रभाकर राजम, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, रायगड-अलिबाग, 102/103, समृध्दी को-ऑप.हौसिंग सेासायटी, घरत आळी, एस.टी.स्टँडजवळ, ई-मेल :[email protected], मो.9421264438.

इच्छुक युवकांनी या प्रशिक्षण केंद्राशी किवा मोबाईल व Whas app क्र. 9421264438/ 9860254943 सपंर्क साधल्यास विहीत नमुन्यातील अर्ज उपलब्ध करुन देण्यात येइल. अर्ज स्वत:चे हस्ताक्षरात भरुन त्यावर संस्थेची शिफारस घेउन दि.29 जून 2020 पर्यंत कार्यालयीन वेळेत कामकाजाचे दिवशी वर नमूद Whas app किवा ईमेल सादर करावेत, असे मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, रत्नाकर प्रभाकर राजम यांनी कळविले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close