Subscribe to our Newsletter
Loading
उद्योगधंदे आणि बिजिनेस

मराठवाड्याचा अविनाश तौर ग्लोबल बेस्ट अप्रेंटीस अवॉर्ड 2020 ने सन्मानित

औरंगाबाद : जगभरातील उमेदवारांची अद्वितीय कामगिरी तसेच व्यावसायिक सक्षमतेचा सन्मान करण्याच्या दृष्टीने फोक्सवैगन ग्रुपच्या वतीने ‘बेस्ट अप्रेंटीस अवॉर्ड 2020’ देण्यात येतो. या वार्षिक सोहळ्याच्या 20 व्या आवृत्तीत मेकॅट्रोनिक्स’मध्ये अविनाश तौर यांना बेस्ट अप्रेंटीस 2020 प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात आले.सध्या महासाथीची पार्श्वभूमी असूनही फोक्सवैगन समुहाने पारितोषिक आणि गौरवाची परंपरा कायम राखली. यंदा फोक्सवैगन ग्रुपकडून ‘बेस्ट अप्रेंटीस अवॉर्ड 2020’ सोहळा व्हर्च्युअल (आभासी) पद्धतीने संपन्न झाला. या पारितोषिक सोहळ्यात फोक्सवैगन ग्रुपचे सीईओ हर्बेर्ट डिएस, वर्क्स कौन्सिल चेअरमन बेर्न्ड ऑस्टेर्लोह आणि ग्रुप एचआर डायरेक्टर गुन्नर किलियन यांच्या हस्ते 19 देशांमधील 51 सर्वोत्तम प्रशिक्षणार्थी उमेदवारांचा सन्मान करण्यात आला. या उमेदवारांची निवड ही त्यांच्या फोक्सवैगन अकॅडमीतील ड्यूएल वोकेशनल ट्रेनिंग, परीक्षांमधील गुणवत्ता तसेच सामाजिक कौशल्यांवर आधारीत राहिली.

स्कोडा ऑटो फोक्सवैगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर गुरप्रताप बोपराय म्हणाले की, “फोक्सवैगन ग्रुपतर्फे देण्यात येणारा बेस्ट अप्रेंटीस अवॉर्ड 2020 आमच्या एका प्रशिक्षणार्थी उमेदवाराने जिंकल्याचा मला आनंद वाटतो. फोक्सवैगन अकॅडमीत उपलब्ध असलेले व्यवसायाभिमुख द्वि-अभ्यासक्रम (ड्यूएल कोर्स) दिमाखदार पद्धतीने पूर्ण करणाऱ्या पदवीधर गटाचे अभिनंदन! हा मेकॅट्रोनिक्स अभ्यासक्रम युवा प्रतिभावंतांचे ज्ञान संवर्धन करण्याच्या दिशेने आमच्या वचनबद्धतेचे बोलके उदाहरण आहे. ज्यामुळे आगामी काळात त्यांना यशस्वी व्यावसायिक घडविण्यासाठी मदत मिळते. त्यांना भविष्यातील विकास, निर्मिती आणि दळणवळण बदलाविषयी सजग करण्यात येते.”अविनाश याने 2016 पासून 2020 पर्यंत तीन वर्षांच्या मेकॅट्रोनिक्स अभ्यासक्रमात सहभाग घेतला होता. हाय स्कूल ग्रॅज्यूएट आणि अल्प-कौशल्य नोकरी सोडलेल्या कामगारांना नवीन युगातील कौशल्य आत्मसात करण्याच्या दृष्टीने हा अभ्यासक्रम तयार केला आहे. जेणेकरून उमेदवारांना आगामी काळातील वाहन उद्योगासाठी तयार करण्यात येईल. अविनाशने या मेकॅट्रोनिक्स अभ्यासक्रमात अद्वितीय कामगिरी बजावल्याने हा सन्मान प्राप्त झाला आहे.

बेस्ट अप्रेंटीस अवॉर्ड 2020 प्राप्त अविनाश तौर यांनी यावेळी आपले मनोगत मांडले. ते म्हणाले की, “माझा अर्ज मेकॅट्रोनिक्स अभ्यासक्रमासाठी स्वीकारून आयुष्याला कलाटणी देणारी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी एसएव्हीडब्ल्यूआयपीएल’चे आभार मानतो. मी मागील तीन वर्षांत जे शिक्षण घेतले, ते मला आगामी काळातील क्षेत्रात उपयुक्त ठरणार आहे. ज्यामुळे मी माझ्या कारकीर्दीला आकार देऊ शकेन.” बीड(मराठवाडा) चा रहिवासी असलेल्या अविनाशने पुणे प्रकल्पात जर्मन-पद्धतीच्या ड्यूएल अप्रेंटीसशीप प्रोग्रामचा भाग म्हणून मॅकेनिकल, इलेक्ट्रीकल, रोबोटीक्स, हार्डवेअर आणि कार इंजिनिअरींगच्या अन्य पैलूंचा अभ्यास केला. या वर्षाच्या पूर्वार्धात अविनाशचा अभ्यास पूर्ण झाला असून तो पुणे प्रकल्पात मशीन शॉप, कॉम्पोनंट रिजनमध्ये कार्यरत आहे. त्याने प्रशिक्षण कालावधीत ‘लिफ्टर मेंटेनन्स इन बॉडी शॉप’, ‘पीएलसी ट्रेनिंग किट मेंटेनन्स’, आणि सिलेंडर हेड स्प्रिंग प्रेसिंग फिक्स्चर मॉडीफिकेशन’ सारख्या प्रकल्पांत काम केले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close