MH20 Live Network

जालना येथील बसस्थानकामध्ये मराठी भाषा दिन साजरा

जालना/प्रतिनिधी जालना येथील बसस्थानकामध्ये मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला मराठी भाषेतील साहित्य स्वर्गीय कुसुमाग्रज यांच्या जन्म दिनानिमित्त मराठी भाषा दिन साजरा करण्यात येतो .कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ पत्रकार अविनाश कव्हळे यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आला आणि सर्वांना मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी आगार व्यवस्थापक पी.डी. चव्हाण, विभाग नियंत्रक प्रमोद नेहुल ,विभागीय भंडार अधिकारी श्री पवार, स्थानक प्रमुख योगेश गीते, सहाय्यक वाहतूक निरीक्षक जे पी देशमुख,वाहक संजय चव्हाण आदी उपस्थित होते.

Exit mobile version