Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

मराठा समाज शांत बसणार नाही – छत्रपती संभाजीराजे


तुळजापूर : सुधीर पवार
महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत ५८ शांत मोर्चे निघाले राज्य सरकार मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी अनेकदा निवेदन आंदोलने मोर्चे काढून सातत्याने याविषयी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला मराठा समाज हा आज आर्थिक सक्षम नसल्यामुळे आणि शैक्षणिक आरक्षण मिळावे यासाठी रस्त्यावर उतरून सरकारकडे न्याय मागतो आहे परंतु मागच्या सरकारने कायद्याच्या चौकटीत बसून दिलेले १३ टक्के आरक्षण आज सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली असल्याने मराठा समाजात असंतोष निर्माण झाला आहे या राज्य सरकारने कोर्टात आपली बाजू मांडण्यासाठी ढिलाई केली त्यामुळे आरक्षणाला स्थगिती मिळाली पण यापुढे जोपर्यंत आरक्षण मिळत नाही किंवा आरक्षणावर स्थगिती हटत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार मराठा बांधव आता यापुढे शांत राहणार नसल्याचे प्रतिपादन खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी तुळजाई नगरीतील मराठा आरक्षणाच्या तिसऱ्या परवाला मार्गदर्शन करताना बोलत होते.

यावेळी पुढे बोलताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले की तुळजाई नगरी तुळजाभवानी माता ही कायमच मराठ्यांची ऊर्जा’दायी आहेत असल्याने सर्वच विधी असो वा कार्यक्रम आई भवानीच्या आशीर्वादाने करत असतो केंद्र सरकार असो वा राज्य सरकार त्यांनी तात्काळ मराठा आरक्षणाला दिलेली स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न करावे अन्यथा मराठा बांधव मी स्वतः हा अन्याय सहन करणार नाही त्यामुळे भविष्यात जोपर्यंत आरक्षणावरील स्थगिती उठत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार मराठा बांधव शांत आहे याचा अर्थ भविष्यात काहीच करणार नाही असा नाही त्यामुळे आमच्या संयमाची परीक्षा न घेता मुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री यांच्यासह केंद्र सरकारने ही मराठ्यांना न्याय देण्यासाठी पावले उचलावीत अन्यथा ठोक मोर्चा चे पाऊल या पुढे संयमी नसणार असाही इशारा छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी दिला.

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या पुण्यपावण नगरीत सरकारच्या विरोधात महाजागर सकल मराठा समाजाचा वतीने मराठा आरक्षण आंदोलनाचा  तिसऱ्या पर्वास आरंभ झाला शुक्रवार दि. ९ ऑक्टोंबर दुपारी वेळ  १२ ते १ च्या दरम्यान शिवाजी महाराज चौका ,छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज मा.खासदार संभाजी राजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजीराजे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले त्यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,मल्हार, राणाजगजितसिंह पाटील, सचिन रोचकरी,विशाल रोचकरी, अभिजित कदम सकल मराठा समाजाचे हजारोच्या संख्यंणे कार्यकर्ते उपस्थित होते. 
मोर्चा डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात आल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार घालून अभिवादन करून तसेच मोर्चा भवानी रोड मार्गी श्री तुळजाभवानी मातेच्या दरबारात शहाजीराजे महाद्वार समोर सरकारच्या विरोधात महाजागर कार्यक्रमास काण्यात आला यावेळी शहाजीराजे महाद्वार परिसरातसह भवानी रोड सर्वत्र भगवे झेंडे लावण्यात आले होते.या सरकारच्या विरोधात महाजागर कार्यक्रमास लातूर,वागदरी,उस्मानाबाद,सोलापूर,उस्मानाबद तालुक्यातील वडगाव,बाबी,कावलदरासह तुळजापूर तालुक्यात सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते बाहेरून आलेल्या कार्यकर्त्यांना शिवाजी चौकात,आंबेडकर चौकात,शहाजीराजे महाद्वाराच्या परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून शहाजीराजे महाद्वार कडेजाणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना आंबेडकर चौकात सर्व सकल मराठा च्या कार्यकर्त्यांना शासनाचे सर्व नियम, अटी नियमाचे पालन करून तसेच सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळून सर्वांना सनीटायजर ची व्यवस्था करण्यात आली होती.
सरकारच्या विरोधात महाजागर कार्यक्रमा नंतर  उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी सर्व सकल मराठा समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते हजारोच्या संख्यंणे उपस्थित होते. तसेच पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणात तगडा बांदोबस्त केला होते.

 ► सकल मराठा समाजाचा वतीने दीपक चौकात तसेच भवानी रोड शेजारी आणि शहाजीराजे महाद्वार परिसरात मोठे मोठे स्क्रीन लावण्यात आले होते जेणेकरून सरकारच्या विरोधात महासागर कार्यक्रम सर्वांना दिसेल अशी व्यवस्था करण्यात आली होती.

 ► सकल मराठा मोर्चाच्या गर्दीचा फायदा घेऊन भुरट्या चोरटे पोलिसांचा तगडा बंदोबस्त असतानाही काही अज्ञात चोरट्यांनी हात साफ केला काहीजणांची सोन्याचे लॉकेट,रोख रक्कम,मोबाईल सह लपास केले .

► तुळजापूर नगरपालिकेच्या वतीने जागोजागी लाकडी बॅरिगेट लावलेले होते,स्वच्छता करण्यात आलेली होती, आंबेडकर चौक येथे पिण्याच्या पाण्याचे जार व हजारो पाणी बॉटल, खाऊ चे वाटप केले गेले,टँकरच्या माध्यमातून सॅनीटायझरची फवारणी केली गेली.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close