Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

येत्या काळात अनेकजण भाजपमध्ये येणार, फडणवीसांचे भाकीत

मुंबई – महाविकास आघाडीत अनेक आमदार येण्यास इच्छुक असल्याचा दावा सत्ताधारी करत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत विधान केले होते. परंतु, सत्ताधाऱ्यांकडून खोटी अफवा पसरवली जात आहे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. भाजपमधून कुणीच कुठे जाणार नाही, उलट भाजपमध्येच अनेक लोक येणार असल्याचे भाकीत त्यांनी वर्तवले आहे. नाशिक येथील माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या पक्षप्रवेशावेळी फडणवीसांनी हे भाकीत केले.

येत्या चार महिन्यांत आपल्याकडचे किती आमदार राजीनामे देऊन आमच्याकडे येतील, हे तुम्हाला देखील कळणार नाही, असे गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केला होता. त्यानंतर चर्चांना उधाण आले होते. तसेच राष्ट्रवादीत लवकरच मेगाभरती होणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले होते. त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, सत्ताधाऱ्यांकडून मुद्दामहून अशी विधाने केली जात आहेत. येत्या काळात अनेकजण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. काहीजण रोज वावड्या उठवतात, की भाजपचे लोक आमच्याकडे येणार आहेत. पण कोणी त्यांच्याकडे जाणार नाहीत, हे त्यांना देखील माहिती आहे. त्यांच्या पक्षातील नाराज आमदारांना संकेत देण्यासाठी हे पुंग्या वाजवत असल्याची टीका फडणवीसांनी केली. तिन्ही पक्षांत अनेक आमदार नाराज आहेत, त्यामुळे त्यांना दिलासा मिळावा, म्हणून बोलले जात असल्याचेही फडणवीस म्हणाले.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close