Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

मंगला विंचुर्णे-बर्दापूरकर पुरस्काराची घोषणा, एमजीएमची राखी तांबट पहिली मानकरी

औरंगाबाद: एमजीएम विद्यापीठाच्या वतीने यंदापासून सुरू करण्यात आलेल्या मंगला
विंचुर्णे-बर्दापूरकर पुरस्काराची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. एमजीएम
वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालयाची विद्यार्थीनी राखी विष्णू तांबट हिला हा पहिला पुरस्कार दिला जाणार आहे. रोख रक्कम, स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप असून १३ फेब्रुवारी रोजी तो प्रदान केला जाणार आहे, अशी माहिती एमजीएम विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. आशीष गाडेकर आणि वृत्तपत्र व जनसंवाद विभागाच्या प्राचार्य डॉ. रेखा शेळके आणि ज्येष्ठ संपादक प्रवीण बर्दापूरकर यांनी दिली आहे. मंगला विंचुर्णे-बर्दापूरकर १९८० आणि ९० या दशकातील महिला पत्रकारितेतील आघाडीचे नाव आहे. त्या ‘नागपूर पत्रिका’ या दैनिकाच्या महाराष्ट्र आवृत्तीच्या संपादक, तसेच ‘लोकसत्ता’च्या नागपूर प्रतिनिधीही राहील्या आहेत.
हेही वाचा :मंत्रालयाच्या इतिहासात प्रथमच शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या कार्यालयाचे वीरमाता मुख्याध्यापिकेच्या हस्ते उद्‌घाटन

आकाशवाणी आणि दूरदर्शनसाठीही त्यांनी विपुल ललित लेखन केले आहे. ज्येष्ठ संपादक, लेखक आणि ब्लॉगर प्रवीण बर्दापूरकर यांच्या त्या पत्नी होत. प्रदीर्घ आजारानंतर मंगला विंचुर्णे-बर्दापूरकर यांचे गेल्यावर्षी निधन झाले. त्यानंतर बर्दापूरकर कुटुंबीयांनी त्यांच्या नावे पत्रकारितेतून प्रथम येणाऱ्या विद्यार्थीनीसाठी पुरस्कार सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली. एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांनीही रकमेत आणखी भर घालत हा पुरस्कार सुरू करण्यास अनुकूलता दर्शवली.
हेही वाचाGood News राज्यातील महाविद्यालये ‘या’ तारखेपासून होणार सुरू

विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर एमजीएम विद्यापीठाच्या वतीने सुरू झालेला हा पहिलाच पुरस्कार आहे. पत्रकारितेच्या पदवी परीक्षेत
विद्यापीठातून सर्वप्रथम येणार्‍या विद्यार्थीनीस मंगला विंचुर्णे-बर्दापूरकर स्मृती परितोषिक आता दरवर्षी प्रदान करण्यात येणार असून राखी तांबट पहिल्या पुरस्काराची मानकरी ठरली आहे.
हेही वाचा- व्हॅलेंटाइन डेनिमित्त सायबर गुन्हेगार सक्रिय ऑनलाईन ऑफर्सना भुलू नका : पोलीसाचे नांगरीकाना आव्हान

मंगला विंचुर्णे-बर्दापूरकर स्मृतीचिन्ह आणि सन्मानपत्राची कलात्मक निर्मिती चित्रकार विवेक रानडे यांची आहे. पुरस्कार वितरण सोहळा १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता महात्मा गांधी मिशनच्या
रुक्मिणी सभागृहात होणार आहे. या समारोहाला एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे संपादक राजीव खांडेकर, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यांची प्रमुख उपस्थिती असेल तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले अध्यक्षस्थानी असतील.
हेही वाचाआरोग्यदायी तीळाचे फायदे काय आहे ,जाणुन घ्या…

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close