Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

मनुष्याने नावाने नव्हे तर कामाने महान होतो – आर्यिका विशाश्री माताजी

आर्यिका विशाश्री माताजी यांच्या हस्ते चातुर्मास कळसाची विधीवत स्थापना

औरंगाबाद / पियुष कासलीवाल

श्री.१००८ खंडेलवाल दिगंबर जैन पंचायत पाश्श्र्वनाथ मंदिर राजाबजार येथे आर्यिका विशाश्री माताजी यांचा चातुर्मास उत्साहात संपन्न झाला असुन मुख्य चार्तुमास कळसाची स्थापना पंचायत अध्यक्ष ललीत पाटणी यांच्या निवासस्थानी करण्यात आली. यावेळी आर्यिका विशाश्री माताजी यांनी उदबोधन करतांंना सांगीतले की, मनुष्य कर्माने महान होत असतो, मनुष्य जीवन हे परमेश्श्वराकडुन आपल्याला वरदान असुन तुम्ही सदैव तुमचे विचार व आचरण शुध्द व निर्मळ ठेवले पाहिजे. ज्या व्यक्तीचे विचार व आचरण चांगले असते ती व्यक्ती महान असते. मनुष्य जीवन हे मानव पध्दतीने जगणे हेच खरे जीवन आहे असे आर्यिका विशाश्री माताजी यांनी कुुवारफल्ली येथील ललीत पाटणी यांच्या निवासस्थानी काढले.
चार्तुर्मास कळसाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी महिलांनी चुंदडी व केशरी रंगाच्या साडया परिधापन केल्या होत्या. यावेळी समाज बांधव जयजयकार करत होते व बॅन्ड पथकाच्या सानिध्यात महिला डोक्यावर कळस घेउâन पुढे चालत होत्या विविध ठिकाणी माताजीचे पादपक्षालन व पुष्पवृष्टी करण्यात आली होती. चातुर्मास कळस स्थापना वेळी आर्यिका माताजींचे पााटणी परिवाराच्या  वतीने पादपक्षालन करण्यात आले व विधीवत कळसाची स्थापना करण्यात आली. यावेळी आ.अतुल सावे, पंचायत अध्यक्ष ललीत पाटणी, सचिव अशोक अजमेरा, उपाध्यक्ष विनोद लोहाडे, सहसचिव नरेद्र अजमेरा,श्रीमती. सुमनबाई पाटणी, सौ.मनिषा पाटणी, शाहु पाटणी, मोनाली पाटणी, मोनाली  पाटणी, शर्मिला पांडया हैद्राबाद, लवीश पाांडया हैद्राबाद, एम.आर.बडजाते, श्रीमती.चंदाबाई पाटणी, डॉ.रमेश बडजाते, चांदमल चांदीवाल, किरण पहाडे, प्रकाश अजमेरा, जितेद्र पहाडे, संजय पापडीवाल, महावीर पाटणी, वर्धमान बाकलीवाल मनोज चांदीवाल, मुकेश कासलीवाल, संतोष कासलीवाल, विपीन कासलीवाल, सावन चुडीवाल, देवेंद्र काला, मनोज दगडा, रमेश कासलीवाल कांबीवाला, डॉ.आर.सी.बडजाते, प्रमोद पांडे, पी.एफ.पाटणी, प्रमोद पाटणी, संजय पाटणी, विनोद पाटणी, अमित कासलीवाल, यश पाटणी, सचिन पाटणी, भरत ठोले, अशोक छाबडा, विजय अजमेरा, कैलास कासलीवाल, महावीर ठोले पियुस कासलीवाल यांच्यासह समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. अशी माहिती प्रचार प्रसार संयोजक नरेंद्र अजमेरा व पियुष कासलीवाल यांनी एका पत्रकाव्दारे दिली

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close