Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

फर्दापूर ग्रा.पं वर महिलाराज कायम;सरपंच पद सर्वसाधारण महीला गटासाठी राखीव



फर्दापूर: ग्रामपंचायत निवडणूकी पासून सुरु असलेल्या सरपंच आरक्षणाच्या चर्चेला दि.29 शुक्रवारी आरक्षण सोडतीनंतर पूर्ण विराम लागला असून फर्दापूर ग्रामपंचायतीचे सरपंच पद सर्वसाधारण (महिला) गटासाठी राखीव झाल्याने फर्दापूर ग्रामपंचायतीवर सलग तिसऱ्यांदा महिला राज कायम झाले आहे.परिणामी यावर्षी सरपंच पदासाठी रस्सीखेच करणाऱ्या सर्वसाधारण गटातील पुरुष सदस्यांचा चांगलाच हिरमोड झाल्याचे दिसून येत आहे.निवडणूक पूर्व आरक्षण सोडतीत फर्दापूर ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षण सर्वसाधारण(खुले) गटासाठी सुटले होते परीणामी सरपंच पदाची लालसा मनात ठेवून अनेक पुरुष उमेदवारांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली होती मात्र त्यानंतर लगेच ग्रामविकास मंत्रालयाने निवडूनकपूर्व आरक्षण सोडत रद्द करुन निवडणूकीनंतर नव्याने सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढण्याचा निर्णय घेतला होता मात्र तरीही सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण(खुल्या) गटासाठी सुटण्याची शक्यता दिसत असल्याने निवडणूकीनंतर निवडून आलेल्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांन मध्ये गटातटाच्या राजकारणाला सुरुवात होवून सरपंच पदासाठी रस्सीखेच सुरु झाली होती,दरम्यान या पार्श्वभूमीवर 18 जानेवारी पासून सरपंच पदासाठी नवनिर्वाचित सदस्यांन मध्ये सुरु असलेल्या नाट्यमय घडामोडीवर दि.29 शुक्रवार रोजी आरक्षण सोडतीनंतर अखेर पडदा पडल्याचे दिसत असलेतरी नव्याने काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीत फर्दापूर ग्रामपंचायती चे सरपंच पद सर्वसाधारण(महिला)गटासाठी राखीव झाल्याने शुक्रवारी दुपारपासूनच सरपंच पदासाठी फर्दापूर येथे पडद्याआड अनेक राजकीय घडामोडी वेगाने घडायला सुरुवात झाल्याचे संकेत मिळत आहे.आरक्षण सोडती नंतर सरपंच पदाचे दावेदार बदलले असलेतरी मोहरे मात्र तेच असल्याने फर्दापूरात नव्याने गटातटाच्या राजकारणाला सुरुवात होण्याची शक्यता स्थानिक राजकीय विश्लेशकांन कडून वर्तविली जात आहे,दरम्यान फर्दापूरात सरपंच कोणत्याही गटाचा बनला तरी सरपंच पदी महिलाच विराजित होणार असल्याने फर्दापूर ग्रामपंचायतीवर मात्र सलग तिसऱ्यांदा महिलाराज कायम राहणार आहे

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close