Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

माधवराव बोरडे हे सामाजिक चळवळीचा श्वास होते: प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे

औरंगाबाद : स्मृतीशेष शिक्षण महर्षी माधवराव बोरडे यांना अभिवादन करण्यासाठी नंदनवन कॉलनी बुद्धविहारात अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले कि, टी.पी. पाटील म्हणाले होते कि माधवराव बोरडे हे दलित समाजात जन्माला आले असे वाटत नाही, येवढे त्यांचे इतर समाजात देखील दानपुण्यकर्म आणि महत्वाचे कार्य आहे. माधवराव बोरडे यांच्या नावाने एखादे प्रतिष्ठान निर्माण करावे. आणि त्यामाध्यमातून विविध सामाजिक लोकहितवादी उपक्रम राबवावे.त्यांच्या नावाने पुरस्कार द्यावे. भिन्नभिन्न जाती समाजाच्या लेकरांना शिक्षणासाठी, राहण्यासाठी त्यांची व्यवस्था करावी. कारण शिक्षणाची पाणपोई माधवराव बोरडेनी सुरु केली होती.असेही ते म्हणाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयभाऊ पाथरीकर, रतनकुमार पंडागळे, डॉ. संजय मुन, देवदत्त म्हात्रे, मुकुंद सोनवणे,माणिक सावंत यांच्यासह अनेक मान्यवराची भाषणं झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेखर मगर यांनी केले.तर आभार प्रदर्शन प्रवीण सूर्यवंशी यांनी केले. यावेळी माधवराव बोरडे यांच्या कुटुंबासह उपासकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close