Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

लोकविकास बँकेचे अध्यक्ष जे.के.जाधव यांना १ लाख २५ हजारांची लाच घेताना अटक. औरंगाबाद एसीबीची कारवाई

औरंगाबाद / mh20live network

लोकविकास बँकेत महामंडळातंर्गत कर्ज प्रकरण मंजूर करून या कर्जाची रक्कम बँकेतून पैसे देण्यासाठी सव्वा लाख रूपयांची लाच स्विकारणाऱ्या राजश्री शाहु इन्स्टिटयूटचा अकांऊंट संतराम पवार याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ राजश्री शाहु इन्स्टिटयुट येथे गुरूवारी (२ जुलै) रोजी अटक करण्यात केली तर लोकविकास बँकेचे अध्यक्ष जे.के. जाधव यांनी ही रक्कम देण्याबाबत तक्रारदार याला सांगितले होते. त्या आधारावर जे. के. जाधव यांनाही अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणाबाबत लाचलुचपत विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एका तक्रारदाराने त्यांंची अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातंर्गत लोकविकास नागरी सहकारी बँक मर्यादित, औरंगाबाद शाखा औरंगाबाद येथून कर्जाची फाईल मंजुर करण्यासाठी व मजुर केलेल्या कर्जाची उर्वरित रक्कम बँकेतून तक्रारदार यांना देण्यासाठी जगन्नाथ जाधव हे १ लाख २५ हजार रूपयांची मागणी करित असल्याची तक्रार संबंधीतांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे देण्यात आली होती. या तक्रारीची शहनिशा संबधीत विभागाने केली असता, जगन्नाथ जाधव यांनी तक्रारदार यांच्याकडे सव्वा लाख रूपयांची लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम आत्माराम संतराव पवार अकाऊटंट राजश्री शाहु इन्स्टीटयुट ऑफ मॅनेजमेंट कॉलेजच यांच्याकडे देण्याचे सांगितले.

तक्रारदारांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत कर्जाची फाईल लोकविकास नागरी सहकारी बँकेत जमा केली आहे. ही फाईल मंजूर करण्यासाठी व मंजूर केलेल्या कर्जाची उर्वरीत रक्कम बँकेतून देण्यासाठी लोकविकास बँकेचा संस्थापक अध्यक्ष व चेअरमन जगन्नाथ जाधव याने लेखापाल आत्माराम पवार याच्या हस्ते तक्रारदारांकडे एक लाख २५ हजारांच्या लाचेची मागणी केली. या अनुषंगाने तक्रारदारांनी एसीबीचे पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्याशी संपर्क साधून तक्रार दिली. या तक्रारीच्या अनुषंगाने एसीबीने शहानिशा केली. त्यानंतर आज दुपारी राजश्री शाहू महाविद्यालयात लाचेची सव्वालाखांची रक्कम स्विकारताना लेखापाल आत्माराम पवार याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याने ही रक्कम जाधवच्या सांगण्यावरुन स्विकारल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला देखील एसीबीने अटक केली. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अधीक्षक चावरिया, अप्पर अधीक्षक डॉ. अनिता जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक सुजय घाटगे, निरीक्षक संदीप राजपूत, पोलिस नाईक बाळासाहेब राठोड, संतोष जोशी, केवल घुसिंगे आणि राजेंद्र सिनकर यांनी केली.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close