Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

लोकरंजन’ कडून कोरोना लसीकरणबाबत लोकजागृती ! ० ‘महाविकास आघाडी’ च्या योजनांचा प्रचार, प्रसार




औरंगाबा/प्रतिनिधी
औरंगाबाद यांच्या वतीने फुलंब्री तालुक्यातील चौदा गावांमध्ये लोकरंजन लोककला प्रतष्ठिानतर्फे  कोरोनासह लसीकरण आणि महाविकास आघाडी
हेही वाचा विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून प्रस्ताव सादर करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या सूचना


सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांबाबत लोकनाट्याच्या माध्यमातून प्रभावी जनजागृती करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क
महासंचालनालय आणि जल्हिा माहिती कार्यालयाच्या वतीने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
हेही वाचा- व्हॅलेंटाइन डेनिमित्त सायबर गुन्हेगार सक्रिय ऑनलाईन ऑफर्सना भुलू नका : पोलीसाचे नांगरीकाना आव्हान


० ज्येष्ठांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमत्ति राज्यभर लोककला पथकामार्फत जनजागृती अभियान राबवण्यिात येत आहे. औरंगाबाद जल्ह्यिातही आठ ते
दहा कलापथकांमार्फ त कोविड-१९ व लोककल्याणकारी योजनांबाबत लोकरंजनातून लोकप्रबोधन करण्यात येत आहे. शाहीर डॉ. शेषराव पठाडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोकरंजन लोककला प्रतष्ठिानच्या वतीने फुलंब्री शहर, किनगाव, वारेगाव, खामगाव, बाबरा, बोधेगाव, पीरबावडा, आळंद, कोलते टाकळी, तळेगाव, वडोदबाजार, शेरोडी, निमखेडा आणि वडोद बाजार या गावांमध्ये कार्यक्रम सादर करण्यात आले. तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांकडून कार्यक्रमाला त्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
हेही वाचा सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणावर 8 मार्चपासून प्रत्यक्ष सुनावणी


० गण-गवळणीने रंगत
शाहीर शेषराव पठाडे यांच्या ‘नमूया आधी देश भारती, मानवतेची करूनी आरती..’ या गणाने लोकनाट्याला सुुरुवात होते. साथीदार विचारतो गणानंतर आता
गवळणी येणार, यावर शाहीर गर्दी करून कोरोनाला आवतन नको म्हणून मथुरेचा बाजार रद्द म्हणून एकच गवळण घेतल्याचे सांंगतो. शाहीर पठाडे यांच्या ‘सोडा गं बाई याला सोडा, कोरोनाला धराया जातो वेडा..’ या लोकगीतावर भाऊ पठाडे बेभान नृत्य करतात. या गाण्यावर लोक ठेका धरतात. लग्नासह सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रांना उपस्थितीबद्दलचे नर्बिंध यावर विविध प्रसंगांतून कलावंत रंग भरतात. गवळण मावशीला काय माल घेतला, असे विचारते. यावर मावशी कोरोना काळात माझं गऱ्हिाईक पक्क असल्याचे सांगून ज्याला हल्ली डिमांड त्यावर आपली कमांड असे म्हणते. मास्क, सॅनिटायझर विकायला घेतल्याचे सांगताच लोक पोट धरून हसतात. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या सरकारच्या अभियानाचे महत्वही विनोदी ढंगातून जनतेला पटवण्यात कलावंत यशस्वी होतात.


हेही वाचामुख्यमंत्री शहरात येण्यापूर्वीच मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक
० समर्पक साथ-संगत
भाऊ पठाडे अस्सल ग्रामीण संवाद फेकून धमाल करतात. शाहीर पठाडे यांची अवीट गोडीची गायकी, त्यांना वंदना एंडोले यांनी दिलेली समर्थ साथ, सद्धिार्थ ढाले यांची हर्मोनियमवर वद्यिुत गतीने फिरणारी बोटे आणि पिटर पाटोळे यांच्या ढोलकीच्या खणखणाटाने कार्यक्रम चांगलाच रंगतो. गजानन मुरकुटे यांची ध्वनी व्यवस्था अखेरच्या प्रेक्षकांपर्यत आवाज पोहचवण्यिात यशस्वी ठरते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावोगावचे सरपंच, ग्रा. पं. सदस्य, पोलीस पाटील, चेअरमन, तंटामुक्तीचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते, शक्षिक, स्थानिक पत्रकारांचे सहकार्य लाभले.
बहिणी-बहिणीची शेती ! निसर्ग पुरक शेती :वाचा सविस्तर news

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close